TRENDING:

Blood Donation: एका क्लिकवर मिळेल रक्तदाता! अ‍ॅप्लीकेशन ठरेल तारणहार, पुणेकर तरुणांची कमाल

Last Updated:

Blood Donation: अपघात, शस्त्रक्रिया किंवा गंभीर आजाराच्या वेळी रुग्णाला बाहेरून रक्ताची गरज भासते. वेळेवर रक्त न मिळाल्यास रुग्णाच्या जीवावर बेतू शकतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: भारतीय संस्कृतीत 'रक्तदाना'ला सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं. विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी रक्ताची निर्मिती प्रयोगशाळेत करता येत नाही. अपघात, शस्त्रक्रिया किंवा गंभीर आजाराच्या वेळी रुग्णाला बाहेरून रक्ताची गरज भासते. वेळेवर रक्त न मिळाल्यास रुग्णाच्या जीवावर बेतू शकतं. ही गरज ओळखून पुण्यातील पियूष शहा आणि त्याच्या मित्रांनी 'ब्लड रिक्वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम' हे उपयुक्त आणि स्मार्ट अ‍ॅप्लिकेशन तयार केलं आहे. पियूष शहाने लोकल१८ शी बोलताना याबाबत सविस्तर माहिती दिली.
advertisement

विद्यार्थी दशेतून सुरू झालेली सामाजिक कल्पना

पियूष शाहा बीई कॉम्प्युटरच्या अंतिम वर्षात असताना, 2018मध्ये एका रुग्णासाठी रक्ताची गरज भासली होती. मात्र, रक्त मिळवण्यासाठी माहिती व प्रक्रिया यांची अडचण जाणवली. त्यातूनच 'ब्लड फॉर पुणे' या संकल्पनेचा जन्म झाला. या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून रक्ताची गरज आणि रक्तदात्याची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

advertisement

Pune Ganpati Visarjan : गणेशभक्तांसाठी धावले पुणे पोलीस, मिरवणुकीत उपचार मिळाल्याने अनर्थ टळला, 48 जण रुग्णालयात

गरजू आणि दाते यांना जोडणारी प्रणाली

या प्रणालीमध्ये रक्तदात्यांची सविस्तर माहिती नोंदवलेली असते. त्यामुळे रक्तदान करताना पुन्हा पुन्हा फॉर्म भरण्याची गरज भासत नाही. या अ‍ॅप्लीकेशनद्वारे रक्तदाता मिळण्यास मदत होते. त्यामुळे गरजूंना लगेच मदत मिळते.

advertisement

अ‍ॅप आणि सोशल मीडियाची जोडणी

अनेक वेळा रक्ताची गरज निर्माण झाल्यावर लोकांना हे अ‍ॅप्लिकेशन माहित नसतं किंवा ते वेळेत डाउनलोड करता येत नाही. ही अडचण लक्षात घेऊन हे अ‍ॅप्लिकेशन थेट सोशल मीडियाशी जोडण्यात आलं आहे. जी व्यक्ती फॉर्म भरते त्याची माहिती 15 सेकंदात फेसबुक आणि एक्सवर (ट्विटर) पोहोचते. त्यामुळे रक्तदात्यांना त्वरीत मदत मिळते.

advertisement

कोरोना काळात ठरली जीवनरक्षक

कोरोना काळात लॉकडाऊनमुळे रक्तसाठा कमी झाला होता. रक्तदान शिबिरे बंद होती आणि रुग्णांना वेळेवर रक्त मिळणं कठीण झालं होतं. अशा वेळी ब्लड फॉर पुणे या अ‍ॅपने मोठी मदत केली. घरबसल्या फॉर्म भरताच काही सेकंदात माहिती सोशल मीडियावर पोहोचायची आणि लगेच रक्तदाता मिळायचा. याच उपक्रमामुळे त्या काळात अनेक रुग्णांचे प्राण वाचले.

advertisement

पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका देखील ब्लड फॉर पुणे या अ‍ॅप्लिकेशन वापरत आहेत. महाराष्ट्र शासनाने देखील या उपक्रमाचा राज्यभर विस्तार करावा, अशी विनंती पियूष शहाने केली आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Blood Donation: एका क्लिकवर मिळेल रक्तदाता! अ‍ॅप्लीकेशन ठरेल तारणहार, पुणेकर तरुणांची कमाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल