TRENDING:

पार्थ पवार जमीन घोटाळ्यातील उपनिबंधक रविंद्र तारुला 8 दिवसांची पोलिस कोठडी, या मुद्द्यांवर होणार चौकशी

Last Updated:

पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनी जमीन गैरव्यवहार प्रकरणात रविंद्र तारू याला बावधन पोलिसांनी रविवारी रात्री बेड्या ठोकल्या. आज न्यायालयाने त्याला ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या संबंधी मुंढवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेला आरोपी उपनिबंधक रविंद्र तारुला न्यायालयाने 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीकडून स्टॅम्प ड्युटी कमी भरून घेण्याचा उपनिबंधक तारु याचा काय उद्देश होता, याची चौकशी पोलीस करणार आहेत.
पार्थ पवार-रविंद्र तारू
पार्थ पवार-रविंद्र तारू
advertisement

पुण्यातील तहसीलदार सूर्यकांत येवले आणि मुख्य आरोपी म्हणून जिच्याकडे संशयाची सुई आहे, त्या शीतल तेजवानी हिच्या अटकेनंतर पुणे पोलिसांनी उपनिबंधक रविंद्र तारू याला अटक केली आहे. पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनी जमीन गैरव्यवहार प्रकरणात रविंद्र तारू याला बावधन पोलिसांनी रविवारी रात्री बेड्या ठोकल्या.

या मुद्द्यांवर होणार आरोपी रविंद्र तारुची चौकशी

advertisement

रविंद्र तारु यांने इतर दोन आरोपींकडून काही रक्कम घेतली का? अमेडिया कंपनीकडून स्टॅम्प ड्युटी कमी भरून घेण्यामागे रविंद्र तारू याचा नेमका काय उद्देश होता? आरोपी तारु यांनी इतर प्रकरणातही अशी कारवाई करून शासनाचे आर्थिक नुकसान केले का? तसेच इतर दोन आरोपी आणि तारु यांच्यामध्ये काही आर्थिक देवाणघेवाण झाली का? अशा मुद्द्यांवर रविंद्र तारु याची चौकशी होणार आहे.

advertisement

पार्थ पवार प्रकरणात कारवाईला वेग

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात पुन्हा सुधारणा, कांद्याला आणि मक्याला काय मिळाला आज भाव? Video
सर्व पहा

पार्थ पवार यांच्याशी संबंधित जमीन घोटाळ्याप्रकरणी ६ नोव्हेंबर रोजी पुण्याच्या बावधन पोलीस ठाण्यात शीतल तेजवाणी, दिग्विजय पाटील, निलंबित सब रजिस्टर रवींद्र तारू यांच्या विरोधात मुद्रांक शुल्क बुडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणाच्या चौकशीसाठी रविंद्र तारू याला ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पार्थ पवार जमीन घोटाळ्यातील उपनिबंधक रविंद्र तारुला 8 दिवसांची पोलिस कोठडी, या मुद्द्यांवर होणार चौकशी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल