ऋषिराज सावंत याच्या अपहरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर आणि यंत्रणा कामाला लागल्यानंतर पुणे पोलिसांनी शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्यासह पत्रकार परिषद घेतली. पुण्याचे पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी याप्रकरणी गुन्हा नोंद असल्याने ऋषीराज सावंत यांची प्राथमिक चौकशी केली जाणार असून त्यांचा बँकाँकसाठीचा पुणे ते चेन्नई प्रवास जाणून घेतला जाईल,असे स्पष्टपणे सांगितले.
advertisement
पोलिसांकडून ऋषिराजची झाडाझडती, ऋषिराजचे अजब उत्तर
पत्रकार परिषदेत सांगितल्याप्रमाणे या सर्व प्रकरणाची चौकशी पुणे पोलिसांनी सुरू केली. ऋषिराज दोन मित्रांबरोबर पुण्यात उतरल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याची झाडाझडती घेतली. कोणत्या कारणासाठी बँकॉकला गेला होता, उद्देश काय होता? घरात वाद झाला होता का? असे प्रश्न पोलिसांनी ऋषिराजला विचारले.
बँकॉकवारीचे कारण विचारल्यावर बिझनेस डिलसाठी बँकाकला चाललो होतो, असे अजब उत्तर त्याने पोलिसांना दिले. पण मग, जाताना वडिलांना का सांगितले नाही? असे पोलिसांनी विचारताच काही उत्तर न देता हाताची घडी तोंडावर बोट अशी अवस्था त्याची झाली होती.
दुबईला कशासाठी गेला होता?
पुणे क्राईम ब्रँचने राञी वाजेच्या दरम्यान रुषिराज सावंत आणि त्याच्या दोन मिञांचा जबाब नोंदवून घेतला. याआधी दुबईलाही बिझनेस डिलसाठीच गेलो होतो, असेही ऋषिराजने पोलिसांना सांगितले. प्राथमिक चौकशीनंतर पुणे पोलिसांनी ऋषिराजला घरी सोडले. मुलगा सुखरूप घरी आल्याने अपहरणाचा गुन्हा तानाजी सावंत मागे घेणार का, असे विचारले जात आहे.