TRENDING:

Pune Rain Updates : पुण्यात रेड अलर्ट! दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा, धरणातून विसर्ग वाढला

Last Updated:

Pune Rains Updates : पुणे शहरात आज सकाळपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मध्यवर्ती भागात मुसळधार तर उपनगरात सुद्धा पावसाचा जोर वाढल्याचा पाहायला मिळतंय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे: पुणे शहरात आज सकाळपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मध्यवर्ती भागात मुसळधार तर उपनगरात सुद्धा पावसाचा जोर वाढल्याचा पाहायला मिळतंय. शहरासह जिल्ह्यात पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार दोन दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
पुण्यात पावसाचा रेड अलर्ट, 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, जनजीवन विस्कळीत, धरणातून विसर्ग वाढवला
पुण्यात पावसाचा रेड अलर्ट, 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, जनजीवन विस्कळीत, धरणातून विसर्ग वाढवला
advertisement

सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे पुणेकरांची मात्र दाणादाण उडाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून पुणे शहरासह इतर काही जिल्ह्यांमध्ये पुढील काही तास मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणेकरांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी असे आवाहन पुणे वेधशाळेने केलं आहे.

> पुण्यातील सिंहगड रस्त्यावर वाहतूक कोंडी...

सिंहगड रस्त्यावर असलेल्या विठ्ठलवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. या कोंडीमुळे सिंहगड रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मुसळधार पाऊस आणि त्यात असलेली वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सिंहगड रोडवरील नव्याने उभारण्यात आलेल्या उड्डाणपूलाचे लोकार्पण न झाल्यामुळे इतर रस्त्यांवर वाहतुकीचा ताण आला आहे.

advertisement

> पुणे जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस

सलग 2 दिवस सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीत होणारा विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने प्रशासनाने नागरिकांना खबरदारीचा इशारा दिला आहे.

> सध्या कुठल्या धरणातून किती विसर्ग

कासारसाई: 560 क्युसेक्स

advertisement

वरसगाव धरण: 3909 क्युसेक्स

खडकवासला धरण: 4170 क्युसेक्स

भाटघर धरण: 12,114 क्युसेक्स

पानशेत: 3996 क्युसेक्स

पवना: 2860 क्युसेक्स

कोकणात पावसाचा हाहाकार

गेल्या चार दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकणात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषता रत्नागिरीतील प्रमुख नऊ नद्यांपैकी सहा नद्या इशारा पातळीच्या वर वाहत आहेत. काजली नदीने इशारा पातली ओलांडल्यामुळ अंजनारी येथील स्वयंभू दत्त मंदिरात पाणी शिरले आहे . तसेच अनेक सखल भागात पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक बंद आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. आज रत्नागिरी जिल्हाला रेड अलर्ट चा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये,  असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune Rain Updates : पुण्यात रेड अलर्ट! दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा, धरणातून विसर्ग वाढला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल