TRENDING:

दिवाळीला आरामात घरी जा! महाराष्ट्राला मिळणार नवा Railway मार्ग, कोणत्या स्टेशनला थांबणार गाडी?

Last Updated:

Maharastra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. विदर्भातील नागपूर (इतवारी) ते नागभीड या 106 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गापैकी एक महत्त्वाचा टप्पा दिवाळीपूर्वीच प्रवाशांसाठी खुला होणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Maharastra Railway : महाराष्ट्रासारख्या राज्याच रेल्वेचं मोठं महत्त्व आहे. दळणवळणासाठी रेल्वे मार्गाचा वापर केला जातो. अशातच आता दिवाळीपूर्वी महाराष्ट्राला मोठं गिफ्ट मिळणार आहे. महाराष्ट्राच्या विकासात भर घालणाऱ्या रेल्वे (Railway) जाळ्याला लवकरच एक नवीन ब्रॉडगेज (Broadgauge) रेल्वेमार्गाची जोड मिळणार आहे. नागपूर (इतवारी) ते नागभीड दरम्यानच्या बहुप्रतिक्षित ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पाचा एक महत्त्वाचा टप्पा यंदाच्या दिवाळीपूर्वीच सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुला होणार असल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी केली आहे.
Maharastra Railway News
Maharastra Railway News
advertisement

 51 किलोमीटरचा टप्पा पूर्ण

नागपूर (इतवारी) ते नागभीड हा एकूण 106 किलोमीटर लांबीचा रेल्वे प्रकल्प आहे, जो नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करत आहे. या प्रकल्पाचे काम महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ (महारेल) मार्फत युद्धपातळीवर सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरपासून उमरेडपर्यंतच्या 51 किलोमीटर लांबीच्या ब्रॉडगेज लोहमार्गाचे काम पूर्ण झाले आहे. याच मार्गावर दिवाळीपूर्वी नवीन रेल्वे सेवा (Railway Service) सुरू करण्यात येणार आहे.

advertisement

कसा असेल रेल्वेमार्ग?

या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाचा 100% खर्च केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये प्रत्येकी 50% विभागलेला आहे. 'महा रेल'कडून ही कामे अत्यंत वेगाने पूर्ण केली जात आहेत, ज्यामुळे हा प्रकल्प लवकरच प्रवाशांच्या सेवेत रुजू होईल अशी अपेक्षा आहे. हा रेल्वेमार्ग विदर्भातील भंडारा (Bhandara) आणि चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यांना नागभीडमार्गे (Nagbhid) थेट नागपूरशी (Nagpur) जोडणार आहे. यामुळे या जिल्ह्यांच्या एकात्मिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. उमरेड, भिवापूर, पवनी कॉम्पा, मोहाळी आणि नागभीड ही या मार्गावरील महत्त्वाची स्थानके राहणार आहेत.

advertisement

कोणाला होईल फायदा?

दरम्यान, आधुनिक ब्रॉडगेज मार्गामुळे दळणवळण व्यवस्था अत्यंत वेगवान होणार असून, प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि गतिमान प्रवासाचा अनुभव घेता येईल. या प्रकल्पाचा कृषी, उद्योग, शिक्षण आणि पर्यटन अशा सर्वच क्षेत्रांना फायदा होणार आहे. या रेल्वे कनेक्टिव्हिटीमुळे जवळपास 14 गावांमधील नागरिकांना नागपूरसारख्या महानगरासोबत थेट संपर्क साधता येणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दिवाळीला आरामात घरी जा! महाराष्ट्राला मिळणार नवा Railway मार्ग, कोणत्या स्टेशनला थांबणार गाडी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल