मुंबई : भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितल्याप्रमाणे राज्यातील पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात झाली आहे. आज 22 जून रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. तर पुढील दोन ते तीन दिवस दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
तसेच उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये 40 ते 50 किमी प्रति तास इतका वारा आणि मेघगर्जनी सह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे उद्या 23 जून रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील, याबाबत हवामान विभागाने काय म्हटलं हे जाणून घेऊयात.
advertisement
मुंबईमध्ये मध्ये 24 तासांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. पुढील 24 तासात मुंबईमध्ये ढगाळ आकाश राहून मेघ गर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 32°c तर किमान तापमान 28 अंश सेल्सिअस इतके राहील. तसेच कोकण विभागातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली.
पुण्यामध्ये पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर कोल्हापूर आणि साताऱ्याला 23 जून रोजी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवस वादळी वाऱ्यासह व मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
भेंडी खातच नाही तर पितातही, याचे खास फायदे असे की विश्वास बसणार नाही!
नैऋत्य मान्सूनने संपूर्ण विदर्भ व्यापला असल्याने विदर्भात मागील काही दिवसांपासून चांगला पाऊस होत आहे. यातच आता पुढील 4 ते 5 दिवस विदर्भात संततधार पाऊस कोसळणार आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांना 23 जून साठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर नैऋत्य मान्सूनने नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याचा काही भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे.
23 जून रोजी या जिल्ह्यासाठी येलो अलर्टचा इशारा -
रेड अलर्ट - सिंधुदुर्ग
ऑरेंज अलर्ट - कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी
येलो अलर्ट - राज्यातील उर्वरित जिल्हे