आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येत असल्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे राज यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. राज यांनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
CM फडणवीसांसोबत भेट का?
राज ठाकरे यांनी फडणवीसांसोब नागरिकांच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. काही दिवसांपूर्वी कुर्लामधील स्थानिक नागरिकांनी जमिनीबाबतच्या मुद्यावर राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी राज ठाकरे यांनी आपण मुख्यमंत्र्यांसोबत भेट घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू असे म्हटले होते. त्यानंतर ही भेट होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
advertisement
बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीनंतर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या निवडणुकीचा आणि आजच्या भेटीचा संबंध नसल्याचे सूत्रांनी म्हटले. राज ठाकरे यांनी विविध सामाजिक-नागरिकांच्या समस्यांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
फडणवीस-राज यांचीदेखील भेट...
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याआधी मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांची वांद्रे येथील तारांकित हॉटेलमध्ये भेट झाली होती. त्यावरूनही राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती.