TRENDING:

Raj Thackeray : राज ठाकरे यांचा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना रोखठोक सवाल, ''निवडणूक नसतानाही...''

Last Updated:

Raj Thackeray : शरद पवार, उद्धव ठाकरे, डॉ. अजित नवले, जयंत पाटील आदींच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी प्रश्नांच्या फैऱ्यांच्या झाडल्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना राज ठाकरे यांचे रोखठोक सवाल, निवडणूक नसतानाही...
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना राज ठाकरे यांचे रोखठोक सवाल, निवडणूक नसतानाही...
advertisement

मुंबई: निवडणूक मतदार यादीतील त्रुटींसह इतर काही प्रक्रियांवर आक्षेप घेत महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांच्या भेटीसाठी दाखल झाले. राज ठाकरे देखील या शिष्टमंडळात आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे, डॉ. अजित नवले, जयंत पाटील आदींच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी प्रश्नांच्या फैऱ्यांच्या झाडल्या. 31 जानेवारी पर्यंत निवडणूक घेण्याचे आपल्याला आदेश आहे. आपण आम्हाला उत्तर द्या की तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात का? असा सवालच राज यांनी केला.

advertisement

मतदारयादीसह प्रभाग रचना आणि इतर मुद्यांवरून आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम आणि मुख्य निवडणूक आयुक्त यांची भेट मविआच्या शिष्टमंडळाने घेतली. दोन वेगवेगळ्या शिष्टमंडळांकडून मुख्य निवडणूक अधिकारी आणि मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले की, मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे. दोन दोन ठिकाणी मतदारांचे नाव कसे असा सवाल त्यांनी केला. वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी असल्याकडे राज यांनी लक्ष वेधले. निवडणूक लागलेली नाही तरी मतदान नोंदणी बंद का केली? जे आज 18 वय पूर्ण करत आहे, त्यांनी मतदान करू नये का? असा सवालच राज यांनी केला. निवडणूक याद्यांमध्ये एवढा घोळ, तुम्ही कसं निवडणुकांना सामोरे जाता? असा सवाल त्यांनी केला. 

advertisement

अजून काय पुरावा हवाय?

विधानसभा निवडणुकी आधी १८ रोजी नोव्हेंबर आम्ही पत्र दिले आयोगाला, खोटे मतदार नोंदणी झाल्या. त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. आज एक आमदार सांगतो की आम्ही बाहेरून मतदार आणले. अजून काय पुरावा हवाय तुम्हाला, असा सवाल शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.

advertisement

घर अस्तित्वात नाही, पण मतदार आहेत...

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले की, आमच्या पक्षाकडून दिल्लीला आणि महाराष्ट्र आयोगाला पत्र दिले होते. आयोग म्हणतं की पत्रच आले नाही. आमच्याकडे पुरावे आहेत. अनेक घरं अशी आहे जी अस्तित्वात नाही, पण तिथे मतदार असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले. एखादं सॉफ्टवेअर वापरुन दुबार मतदार मतदार यादीतून बाहेर काढा, अशी मागणी देखील त्यांनी केली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले की, आमच्या पक्षाकडून दिल्लीला आणि महाराष्ट्र आयोगाला पत्र दिले होते. आयोग म्हणतं की पत्रच आले नाही. आमच्याकडे पुरावे आहेत. अनेक घरं अशी आहे जी अस्तित्वात नाही, पण तिथे मतदार असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले. एखादं सॉफ्टवेअर वापरुन दुबार मतदार मतदार यादीतून बाहेर काढा, अशी मागणी देखील त्यांनी केली. मतदार यादींमध्ये दुरुस्ती करुन निष्पक्ष मतदान घेतले जावे. आम्ही काही दिवसांत तुम्हाला काही पुरावे देणार असून खोटे मतदार हे लाखांच्या घरात असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला.

advertisement

तर, आम्ही घेतलेल्या हरकतीला निवडणूक आयोग प्रतिसाद देत नसल्याचा आरोप शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी बैठकीत केला.

शिष्टमंडळात कोण?

मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या भेटीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. अजित नवले, ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई,  आमदार अनिल परब, शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील, राष्ट्रवादी पवार गटाचे शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, समाजवादी पक्षाचे नेते रईस शेख, भाकपचे कॉ. प्रकाश रेड्डी उपस्थित आहेत.

ठाकरे बंधूंचा एकत्रित प्रवास...

ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा होत असताना दुसरीकडे आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रितपणे प्रवास करत मंत्रालय गाठले. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांच्या भेटीआधी उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह मविआचे नेते ठाकरे गटाचे कार्यालय शिवालय येथे जमले. या ठिकाणी छोटी बैठक झाली. या बैठकीनंतर उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्रितपणे कारमधून प्रवास केला. या वेळी ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. या बैठकीच्या निमित्ताने राज ठाकरे हे जवळपास 20 वर्षानंतर शिवालय कार्यालयात दाखल झाले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळीसाठी स्टायलिश कुर्तीज, किंमत 300 रुपये,मुंबईतील या मार्केटमध्ये करा खरेदी
सर्व पहा

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Raj Thackeray : राज ठाकरे यांचा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना रोखठोक सवाल, ''निवडणूक नसतानाही...''
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल