उद्धव ठाकरेंच्या आधी राज मातोश्रीवर
संजय राऊत यांच्या नातवाच्या बारशाच्या कार्यक्रमातून राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या आधीच निघाले होते. तिथून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या मातोश्रीवर ते पोहोचले. त्या पाठोपाठ उद्धव ठाकरे हे देखील मातोश्रीवर पोहोचले. यावेळी राज ठाकरेंसोबत पत्नी शर्मिला ठाकरे देखील होत्या. शर्मिला ठाकरे या अनेक वर्षांनी मातोश्रीवर दाखल झाल्या. या कौटुंबिक जवळीकीमुळे दोन्ही बंधूमधील वाद संपुष्टात आल्याचे चित्र आहे.
advertisement
ठाकरे कुटुंबियांचा एकत्रित फोटो...
संजय राऊत यांच्या नातवाचा आज नामकरण सोहळा होता. या कार्यक्रमात राज ठाकरे हे पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासह पोहचले होते. तर, उद्धव ठाकरे हे रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह दाखल झाले. कार्यक्रमात उद्धव आणि राज यांच्यात काही वेळ चर्चाही झाली. बारशाच्या कार्यक्रमात ठाकरे कुटुंबीयांनी एकत्रित फोटोदेखील काढला. यावेळी राज ठाकरे यांच्या शेजारी आदित्य ठाकरे उभे राहिले होते.
या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संजय राऊत व इतरांसोबतही संवाद साधला.
>> ठाकरे बंधूंच्या भेटीगाठींचा सिलसिला
5 जुलै 2025
मराठी विजयी मेळावा
विजयी मेळाव्यानिमित्त
2 दशकानंतर ठाकरे बंधू एकत्र
27 जुलै 2025
मातोश्री
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त
राज ठाकरेंनी 'मातोश्री'वर जाऊन शुभेच्छा दिल्या
27 ऑगस्ट 2025
शिवतीर्थ निवासस्थान
गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे सहकुटुंब 'शिवतीर्थ'वर
ठाकरे कुटुंबाचं मनोमिलन
10 सप्टेंबर 2025
शिवतीर्थ निवासस्थान
उद्धव ठाकरे संजय राऊत, अनिल परबांसह राज ठाकरेंच्या भेटीला