या सगळ्या प्रकरणावर आता नगर पोलीस दलाच्या अधिकाऱ्याने प्रतिक्रिया दिली आहे. कोटला गावात नक्की काय घडलं? याची सविस्तर माहिती त्यांनी दिली आहे. एका गटाकडून सुरू असलेल्या रास्ता रोकोबद्दल विचारला असता संबंधित पोलीस अधिकाऱ्याने सगळा घटनाक्रम सांगितलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "आज सकाळी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका रस्त्यावर रांगोळी काढली होती. त्या रांगोळीवरून एका समाजाने त्यावर आक्षेप घेतला. त्यावरून एक गुन्हा दाखल केला होता. ज्याने रांगोळी काढली होती, त्याला पोलिसांनी अटकही केली होती. त्यानंतर संबंधित गटाचे काही लोक कोटला या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी रास्ता रोको केला. त्यांना रस्त्यावरून हटण्याची सूचना केली, विनंती केली, तरीही ते तिथून निघून जात नव्हते."
advertisement
"यावेळी आंदोलकांमधील काही लोकांनी दगडफेक सुरू केली. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केला आहे. रस्त्यावर जो जमाव जमा झाला होता, तो पांगवला आहे. तसेच काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुढील कारवाई पोलीस केली जात आहे," अशी माहिती पोलिसांनी दिली.