सोलापूर: ती डान्सर आणि तो प्लॉटिंगच्या व्यवसायात बक्कळ पैसा कमावणारा, लग्न झालं असून तो तिच्या प्रेमात पडला. पाण्यासारखा पैसा तिच्यावर उधळला. पण जेव्हा तिने ब्लॅकमेलिंग सुरू केलं. तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने तिच्या मागण्या पूर्ण करण्यास नकार दिला. जेव्हा तिने धमकी दिली तेव्हा तिच्याच घरासमोर कारमध्ये बसून स्वत: वर गोळी झाडून संपवलं. एखाद्या सिनेमाला लाजवेल अशी घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी इथं गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणाची घडली. बर्गेच्या कुटुंबीयांनी डान्सर पूजा गायकवाडवर अनेक गंभीर आरोप केले पण आता तिने भलतीच कबुली दिली आहे.
advertisement
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसलाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी इथं एका कारमध्ये गोळी झाडून आत्महत्या केली. या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांनी नर्तिका पूजा गायकवाडला अटक केली असून ती सध्या पोलीस कोठडीत आहे. पण, आता तिने गोविंद बर्गे यांच्यासोबत एक धक्कादायक कबुली दिली आहे. गोविंद बर्गे यांच्यासोबत आपले संबंध असल्याची पूजा गायकवाड हिनी पोलिसांना कबुली दिली आहे.
तेव्हा पूजा कला केंद्रातच होती
गोविंद बर्गे यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली, तेव्हा पूजा गायकवाड ही सासुरे गावात नसल्याचं समोर आहे. त्यावेळी पारगाव येथील कला केंद्रात पूजा गायकवाड ही रात्रभर असल्याची पोलिसांची माहिती दिली आहे. पूजा गायकवाडचा कॉल लागत नसल्यामुळे गोविंद बर्गे हा गेवराईवरून तिला शोधत बार्शी तालुक्यातील वैरागजवळ आला होता. तिथे आल्यावर गोविंद यांनी पूजाला अनेक फोन केले होते. आता गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांच्यातील कॉल संबंधावरून तपासाची दिशा ठरणार आहे. पूजा गायकवाड हिला गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येप्रकरणी तीन दिवसाची पोलीस कोठडीत आहे. त्यामुळे पोलीस आता सगळ्या बाजूने तपास करत आहे.
काय आहे प्रकरण?
गोविंद कला केंद्रात (Kala Kendra Dancer) पूजा गायकवाड नावाची ही नर्तिक आहे. गोविंद बर्गे हे तिचा डान्स पाहण्यासाठी कला केंद्रात गेले आणि तिच्या प्रेमात पडले. हा प्रेमाचा खेळ दीड वर्ष सुरू होता. पण, जसे जसे पूजाच्या जाळ्यात गोविंद अडकत गेले, तशा त्यांच्या अडचणी वाढल्या. पूजाने गोविंद यांच्याकडे सोनं, मोबाईल असे अनेक गिफ्ट मागितले. प्रेमापोटी गोविंद यांनी तिला सोनं आणि चांदीच्या दागिन्यांसह दोन लाख रुपयांचा आयफोन मोबाईलही दिला होता.
पण पूजाचा आता गोविंदच्या घरावर डोळा होता. तिने बर्गे यांचं गेवराईमधील राहतं घर आपल्या नावावर करून देण्यासाठी तगादा लावला. यातून दोघांमध्ये वाद झाला. गोविंदने हे करायला नकार दिला. त्यामुळे पूजाने त्याच्याशी बोलणं बंद केलं. एवढंच नाहीतर तिने गोविंदला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी सुद्धा दिली होती. पूजाने धमकी दिल्यामुळे गोविंद हे उद्गिग्न झाले होते.
गेल्या पाच ते सहा दिवसांपासून संपर्कात नसल्यामुळे गोविंद हा पुजाच्या घरासमोर आला होता. नर्तिकाच्या घरासमोरच गाडीमध्ये ड्रायव्हर सीटला बसून पिस्तूल मधून गोळी गोविंदने उजव्या कपाळातून डाव्या बाजूला फायर करून घेतली. यात गोविंदा जागीच मृत्यू झाला. अखेरीस गोविंद बर्गे यांचे मेहुणे लक्ष्मण जगन्नाथ चव्हाण यांनी वैराग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गोविंद हा विवाहित होता त्याला एक नववीत शिकणारी मुलगी आणि सहावीत शिकणारा मुलगा होता. याप्रकरणी पूजा गायकवाड हिला वैराग पोलिसांनी अटक केली असून आता ती पोलीस कोठडीत आहे.