जयंत पाटील काय म्हणाले?
‘मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. सात वर्षाचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे. तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती करेन, शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे. पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचं आहे, असं म्हणत जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार होण्याचे संकेत दिले आहे. अशातच आता रोहित पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय. जयंत पाटील यांच्यानंतर रोहित पवार शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष असतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
advertisement
रोहित पवार म्हणतात....
राष्ट्रवादीत खांदेपालट होणार का? असा सवाल जेव्हा रोहित पवारांना विचारला गेला. तेव्हा हे सगळे निर्णय पदाधिकारी घेत असतात. आमच्याकडे कुठलंही पद नसल्याने आम्ही त्यावर वक्तव्य करु शकत नाही. आम्ही फक्त आमदार आणि साधे कार्यकर्ते आहोत. पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असल्याने ते बोलतील त्यानुसार आम्हाला काम करावं लागेल, असं म्हणत रोहित पवार यांनी सुचक वक्तव्य केलं आहे.
राजकारणात मतभेत असावेत मनभेद नसावेत - सुप्रिया सुळे
दरम्यान, राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनानिमित्त प्रकाशित झालेल्या मासिकामध्ये सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलं. माझ्या मनात जे आलं ते मी लिहिलं, माझी आणि माझ्यातली गोष्ट आहे. अजित पवारांसोबत जाण्यासाठी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याससोबत कोणतीही चर्चा झालेली नाही अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. आमचे 8 खासदार काय निर्णय घेतील ते पाहुया असं म्हटलं आहे. आम्ही कुटुंब म्हणून सोबत असतो, राजकारणात मतभेत असावेत मनभेद नसावेत. आधी लग्न कोंढाण्याचं आधी राष्ट्र मग महाराष्ट्र, 8 खासदार मिळून एकत्रित निर्णय घेतील, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.