TRENDING:

व्यवस्थेच्या छाताडावर पाय रोवून मी इथपर्यंत आले, गरज पडली तर ख्वाडा... रुपाली पाटील यांचा इशारा कुणाला?

Last Updated:

Rupali Patil vs Rupali Chakankar: महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याशी गेल्या काही काळापासून रुपाली पाटील यांचा संघर्ष सुरू आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या तोंडावरच राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून उचलबांगडी झाल्याने नाराज झालेल्या रूपाली पाटील यांनी आगामी काळातील इरादे स्पष्ट करणारी फेसबुक पोस्ट केली आहे. व्यवस्थेच्या छाताडावर पाय रोवून मी इथपर्यंत पोहोचले आहे. गरज पडली तर ख्वाडा करेन, असा सूचक इशारा त्यांनी पक्षनेतृत्वाला दिला आहे. अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याशी झालेल्या संघर्षानंतर त्यांना प्रवक्तेपदावरून दूर केले गेले.
रुपाली पाटील-रुपाली चाकणकर-अजित पवार
रुपाली पाटील-रुपाली चाकणकर-अजित पवार
advertisement

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याशी गेल्या काही काळापासून रुपाली पाटील यांचा संघर्ष सुरू आहे. फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी महिलेची बदनामी केल्याचा आरोप करून रुपाली पाटील ठोंबरे यांनी पुन्हा एकदा संघर्ष छेडला. अगदी त्यांना चाबकाने फोडून काढण्याची भाषा वापरली. त्याची दखल पक्षाने लगोलग घेऊन कारवाई केली. मात्र पक्षाकडून झालेल्या कारवाईनंतर रुपाली पाटील दुखावल्या गेल्या आहेत. त्यांनी फेसबुक पोस्ट करून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

advertisement

व्यवस्थेच्या छाताडावर पाय रोवून मी इथपर्यंत आले, गरज पडली तर ख्वाडा

शेतकरी कन्या डॉ. संपदा मुंडे यांना न्याय न देता त्यांच्या चारित्र्यावर आघात करण्यात आला. या अन्यायाविरुद्ध आपण आवाज उठवणार असल्याचे सांगत माझा आवाज दाबला जाईल? असा सवाल करून प्रस्थापित व्यवस्थेच्या छाताडावर पाय रोवून मी इथपर्यंत पोहोचले आहे. आमचा इतिहास अन्याय सहन करणाऱ्यांचा नाही, असे पक्ष नेतृत्वाला त्यांनी ठणकावून सांगितले आहे. गरज पडली तर ख्वाडा करेन, असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी दिला आहे.

advertisement

ख्वाडा चित्रपटाचा प्रसंग, व्यवस्थेच्या विरोधात लढाई करण्यास सज्ज

प्रयोगशील दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्या ख्वाडा चित्रपटाचा एक प्रसंग फेसबुकवर शेअर करून व्यवस्थेच्या विरोधात लढाई करण्यास सज्ज असल्याचेच अप्रत्यक्षपणे रुपाली पाटील यांनी सांगितले.

रुपाली पाटील आणि अमोल मिटकरी यांच्यावर पक्षाची कारवाई, प्रवक्तेपदावरून बाजूला केले

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्यातील खरटमल कुटुंबाचा अनोखा छंद, जुन्या ग्रामोफोनचा केला संग्रह,काय आहे खास?
सर्व पहा

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांआधी पक्षातील महिला नेत्यांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या कारणातून पक्षाची प्रतिमा मिलन होत असल्याने रुपाली पाटील यांची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी करण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला. रुपाली पाटील यांच्यासोबत आमदार अमोल मिटकरी यांनाही पक्षाने प्रवक्तेपदावरून बाजूला केले. पक्षातील दोन धडाडीच्या प्रवक्त्यांना बाजूला सारून निवडणुकीच्या आधी प्रतिमा उंचाविण्याचा प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान पक्षाच्या निर्णयावर दोन्ही नेते नाराज असल्याचे कळते. परंतु तरीही निवडणुकांना ताकदीने सामोरे जाण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
व्यवस्थेच्या छाताडावर पाय रोवून मी इथपर्यंत आले, गरज पडली तर ख्वाडा... रुपाली पाटील यांचा इशारा कुणाला?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल