प्राचीन काळात एका अज्ञात रोगाने जनावरांवर मोठा कहर केला होता. या संकटातून सुटका व्हावी, म्हणून हिंदू-मुस्लिम पशुपालकांनी मिया साहेब दर्ग्याला प्रार्थना केली. त्या वेळी या रोगाचा प्रकोप हळूहळू कमी झाला, त्यामुळे दरवर्षी मियासाहेब दर्ग्यात कृतज्ञतेने पशू मिरवणूक काढण्याची परंपरा सुरू करण्यात आली, असे स्थानिक जाणकार सांगतात.
advertisement
सगर परंपरेचे साजरेपण
या दिवशी, शहरातील गवळी, शेतकरी आणि पशुपालक आपल्या पशूंना सजवून, सादर करतात. दर्ग्याजवळ आणि शहरात ठिकठिकाणी पशू प्रदर्शन आयोजित केले जाते, जिथे सजवलेल्या जनावरांची स्पर्धा होते. यात सर्वोत्कृष्ट सजवलेल्या जनावरांना इनाम दिले जाते, यामुळे पशुपालकांचे समाधान आणि उत्साह द्विगुणित होतो.
कीड अन् रोगाचा त्रास नाही, खर्च कमी आणि उत्पन्नही जोरदार, गुजराथी शेतकरी नेमकं कशाची शेती करतोय?
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक
सगर परंपरेत हिंदू आणि मुस्लिम समाज एकत्र येऊन या उत्सवात सहभागी होतात. मुस्लिम समाज हिंदू पशुपालकांचा आदर सत्कार करतो, तसेच पान-सुपारी देऊन त्यांचा सन्मान करतो. जालना शहरातील मिया साहेब दर्ग्यासह विविध ठिकाणी सगर साजरा करण्यात येतो. सगर ही केवळ एक परंपरा नसून, सामाजिक ऐक्याचे प्रतीक म्हणून ही परंपरा महत्त्वाची ठरते.





