राजकीय समीकरणे कशी बदलली?
गेल्या काही काळात इस्लामपूरच्या राजकारणातून बरेच पाणी वाहून गेले आहे. विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या रणनीतीने जयंत पाटील यांच्या गटाला आव्हान दिले. निशािकांत पाटील यांच्यासारख्या नेत्यांनी अजित पवारांना साथ दिल्याने राष्ट्रवादीची ताकद विभागली गेली. आता अजित पवार यांनी इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात आपला प्रभाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. शिराळा मतदारसंघात शिवाजीराव नाईक यांच्या रूपाने पक्षाला नवी ऊर्जा मिळाली आहे, तर दुसरीकडे उद्योग क्षेत्रात केलेल्या कामामुळे अजित पवारांनी दोन्ही मतदारसंघांत आपली उपस्थिती जाणवून दिली आहे.
advertisement
आगामी पालिका निवडणूक ठरणार निर्णायक
या सर्व पार्श्वभूमीवर आगामी इस्लामपूर नगरपालिका निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. कारण निशिकांत पाटील, संजय कोरे, जयवंत पाटील, मनीशा पाटील यांनी राष्ट्रवादीची बांधणी सुरू केली आहे. अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे समर्थक ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याच्या तयारीत आहेत. वाळवा तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष केदार पाटील यांनी "आम्ही घड्याळ चिन्हावरच लढणार," असे ठामपणे सांगून अजित पवारांची 'एंट्री' निश्चित असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता ही निवडणूक केवळ स्थानिक नेत्यांपुरती मर्यादित न राहता, थेट अजित पवार विरुद्ध जयंत पाटील अशी प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे.
हे ही वाचा : आता थांबायचं नाय! मुंबई महापालिकेचा मराठा आंदोलकांसाठी मोठा निर्णय, 24 तास मिळणार 'या' गोष्टी
हे ही वाचा : सांगलीत लाडक्या बहिणींना धक्का! जिल्ह्यात 'इतक्या' लाख महिला अपात्र, शासनाने 25 कोटींचा निधी रोखला