मध्य रेल्वेने हुबळी-ऋषिकेश एक्स्प्रेस व बिहार हुबळी-प्रयागराजला जाणाऱ्या मुझफरपूर एक्प्रेस या दोन गाड्यांना व परतीच्या दोन गाड्यांना सांगली स्टेशनवर थांबा मंजूर केला आहे. या निर्णयाचा सांगीलकर प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. प्रत्येक गाडीत प्रत्येक फेरीसाठी सांगलीकर प्रवाशांना या निर्णयामुळे 600 पेक्षा जास्त तिकिटांची भरीव उपलब्धता झाली आहे.
15 वर्षे जुनी वाहने आता थेट भंगारात, सरकारचा मोठा निर्णय, अंमलबाजवणीचे निर्देश
advertisement
हुबळी-मुजफ्फरपूर एक्स्प्रेस गाडी क्रमांक 0715, मुजफ्फरपूर ते हुबळी गाडी क्रमांक 0716, हुबळी-ऋषिकेश एक्स्प्रेस गाडी क्रमांक 06225, ऋषिकेश ते हुबळी गाडी क्रमांक 06226 अशा गाड्यांची उपलब्धता येथील प्रवाशांसाठी झाली आहे. हुबळी-ऋषिकेश एक्स्प्रेसमुळे कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, विटा, तासगाव, आष्टा, इस्लामपूर येथील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. हुबळी-ऋषिकेश एक्स्प्रेसमध्ये स्लीपर क्लासची 500, तर एसी स्लीपर क्लासची 100 अशी एकूण 600 तिकिटांची उपब्लधता आहे. प्रवाशांनी आताच तिकिटांचे ऑनलाईन बुकिंग करावे, असे आवाहन रेल्वे डेव्हलपेंट ग्रुप व नागरिक जागृती मंचच्या वतीने करण्यात आले आहे.
ऋषिकेशहून रविवारी सांगलीत
ऋषिकेश-हरिद्वर-हुबळी अशा परतीच्या मार्गावर ऋषिकेश रेल्वे स्टेशनवरून प्रत्येक शुक्रवारी सायंकाळी 5:55 वाजता सुटून हरिद्वार येथे सायंकाळी 6: 58 ला येईल. तिथून पुन्हा त्याच मार्गे ही गाडी रविवारी 11.27 वाजता सांगलीत दाखल होईल.
हुबळी-ऋषिकेश मंगळवारी
हुबळी-हरिद्वार-ऋषिकेष विशेष रेल्वे सांगलीतून मंगळवारी पहाटे 3:35 ला रवाना होईल. त्यानंतर सातारा, पुणे, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडोबा, भोपाल, बिना, झांसी, मथुरा, दिल्ली, निजामुद्दीन, गाझियाबाद, मिरज सिटी, खटवली, मुजफ्फरनगर, देवबंद, टपरी, रुरकीहून बुधवारी 4:10 वाजता हरिद्वाराला जाईल. नंतर ऋषिकेशला सायंकाळी 6:45 ला पोहोचेल.






