TRENDING:

'चिल्लर नाही' म्हणणाऱ्या कंडक्टरची आता खैर नाही; एसटी महामंडळाने घेतला 'हा' मोठा निर्णय!

Last Updated:

एसटी महामंडळाने प्रवाशांचे पैसे घेऊनही तिकीट न देणाऱ्या, तसेच सुट्ट्या पैशांच्या नावाखाली गैरव्यवहार करणाऱ्या वाहकांवर कठोर कारवाई सुरू केली आहे. तपासणी पथकाने...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सांगली : एसटी बसमध्ये अनेकदा वाहक (कंडक्टर) तिकीट न देता प्रवाशांचे पैसे स्वतःच्या खिशात घालतात. कधी मध्येच उतरलेल्या प्रवाशांचे जुने तिकीट नवीन प्रवाशाला देऊन पैशांची अफरातफर करतात, तर कधी सुट्ट्या पैशांच्या बहाण्याने प्रवाशांना लुबाडतात. अशा गैरव्यवहार करणाऱ्या वाहकांवर एसटी महामंडळाने आता कठोर कारवाई करायला सुरुवात केली आहे. गेल्या वर्षभरात अनेक वाहकांना निलंबित करून घरी बसवण्यात आले आहे.
ST bus conductor
ST bus conductor
advertisement

एसटी प्रशासनाकडून चालक-वाहकांवर विविध कारणांमुळे कारवाई केली जाते. गणवेश आणि ओळखपत्र नसणे, कामावर असताना मद्यपान करणे किंवा नियमांचे उल्लंघन करणे अशा अनेक कारणांमुळे त्यांच्यावर कारवाई होते. पण आता प्रवाशांचे पैसे घेऊनही तिकीट न देणे, सुटे पैसे परत न करणे, किंवा ड्युटी संपल्यानंतर जमा झालेले पैसे वेळेत डेपोमध्ये जमा न करणे अशा आर्थिक गैरव्यवहारांमुळे वाहकांवर कठोर कारवाई केली जात आहे.

advertisement

अशी होते कारवाई आणि तपासणी

  • जादा रक्कम आढळल्यास : एसटी प्रवास करत असताना तपासणी पथक वाहकाची अचानक तपासणी करते. जर वाहकाकडे तिकीट विक्रीपेक्षा जास्त रक्कम आढळली, तर त्याला त्याबाबत खुलासा विचारला जातो. अनेकदा कमी रक्कम आढळल्यास देखील विचारणा होते आणि कारवाई केली जाते.
  • पैशांची नोंद : प्रत्येक वाहकाला ड्युटी सुरू होण्यापूर्वी त्याच्याकडील वैयक्तिक पैशांची नोंद आगारात करणे बंधनकारक असते. जर तपासणीत नोंद केलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे आढळले, तर त्याचाही खुलासा द्यावा लागतो.
  • advertisement

  • तपासणी पथक : एसटीच्या तपासणी पथकाकडून वाहकाकडील तिकीट विक्रीची आणि पैशांची नियमित तपासणी केली जाते.

गैरव्यवहाराचे प्रमाण कमी, तरीही सतर्कता

सांगली विभागात वाहकांकडून होणाऱ्या आर्थिक गैरव्यवहाराचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे. जिल्ह्यात सध्या 1122 चालक आणि 982 वाहक असे एकूण 2104 कर्मचारी कार्यरत आहेत. तरीही, एसटी महामंडळ कोणत्याही गैरव्यवहाराला थारा देण्यास तयार नाही.

advertisement

90 दिवसांचे निलंबन

गैरव्यवहार करणाऱ्या वाहकांवर कारवाई म्हणून किमान 90 दिवसांचे निलंबन केले जाते. या निलंबनाच्या काळातही त्यांची चौकशी सुरूच राहते. प्रवाशाला सुटे पैसे परत न देणे, जुने तिकीट दुसऱ्या प्रवाशाला विकणे, प्रवाशाचे पैसे घेऊनही तिकीट न देणे अशा अनेक प्रकारांचा तपासणीत समावेश असतो.

हे ही वाचा : हाण की बडीव! 2 तृतीयपंथींच्या गटात तुफान हाणामारी; पोलिसांच्याही अंगावर गेले धावून आणि मग...

advertisement

हे ही वाचा : साताऱ्यात गणेश मिरवणुकीत 'डीजे'चा वाढला आवाज, पोलिसांनी केली एंट्री; मग पुढे नेमकं घडलं काय? 

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
'चिल्लर नाही' म्हणणाऱ्या कंडक्टरची आता खैर नाही; एसटी महामंडळाने घेतला 'हा' मोठा निर्णय!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल