साताऱ्यात गणेश मिरवणुकीत 'डीजे'चा वाढला आवाज, पोलिसांनी केली एंट्री; मग पुढे नेमकं घडलं काय? 

Last Updated:

साताऱ्यात गणेश आगमनाच्या मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन करत डीजेचा आवाज 110 डेसिबलपर्यंत वाढवल्याने शाहूपुरी पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. या प्रकरणी...

Satara News
Satara News
सातारा : शहरात गणेशोत्सवाची सुरुवात होण्यापूर्वीच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डीजे मालकांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. गणेशमूर्ती आगमनाच्या मिरवणुकीत 110 डेसिबलच्या मर्यादेपलीकडचा मोठा आवाज करत डीजे दणाणल्याने शाहूपुरी पोलिसांनी यावर तात्काळ दखल घेतली. या प्रकरणी डीजे मालकासह बीम लाईट चमकवणाऱ्या चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गुन्हा दाखल झालेले हे आहेत डीजे मालक
डीजे मालक रजनीकांत चंद्रकांत नागे, धीरज महाडिक (दोघे रा. सातारा), दीपक जगताप (रा. भोसरी, पुणे), आणि हर्षल राजाराम शिंदे (रा. पाटखळ, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हवालदार अमोल साळुंखे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
नियमांचे सरळसरळ केलं उल्लंघन
पोलिसांच्या फिर्यादीनुसार, १० ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता साताऱ्यातील देवी चौकात गणेश आगमनाची मिरवणूक सुरू होती. या मिरवणुकीत ट्रॅक्टर-ट्रॉलीवर लावलेल्या डीजेचा आवाज मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला होता. डीजेसोबत लावलेल्या बीम लाईट आणि एलईडी स्क्रीनमुळे लोकांच्या डोळ्यांना त्रास होत होता. यामुळे मानवी जीवनाला धोका निर्माण झाला होता. तसेच, या मिरवणुकीमुळे रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना अडथळा निर्माण झाला. डीजे मालकाने पोलिसांनी दिलेल्या नियमांचे सरळसरळ उल्लंघन केल्याचे दिसून आले.
advertisement
कारवाई होणार पोलिसांनी दिला इशारा
जेव्हा पोलिसांनी ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या मागे असलेल्या जनरेटरचा टेम्पो थांबवण्यास सांगितले, तेव्हा चालक परवानगीशिवाय निघून गेला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कठोर पाऊले उचलत संबंधितांवर गुन्हे दाखल केले. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच डीजे मालकावर कारवाई झाल्याने इतर डीजे मालकांचे धाबे दणाणले आहेत. यापुढे नियमांचे पालन न करणाऱ्यांवर अशीच कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
advertisement
शांतता क्षेत्रातील आवाजाची मर्यादा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहिवासी क्षेत्रात दिवसा 55 डेसिबल आणि रात्री 45 डेसिबल आवाजाची मर्यादा आहे. तसेच शाळा, रुग्णालये आणि न्यायालयांच्या परिसरात दिवसा 50 डेसिबल आणि रात्री 40 डेसिबलपेक्षा जास्त आवाज झाल्यास तो ध्वनिप्रदूषण मानला जातो आणि त्यावर कारवाई होऊ शकते. या मिरवणुकीत वाजलेल्या डीजेचा आवाज 110 डेसिबल होता, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी ध्वनिप्रदूषणाचे नेमके उल्लंघन किती झाले आहे, याचा अहवाल लवकरच स्वतंत्र तपासणी यंत्रणेमार्फत वरिष्ठांकडे पाठवला जाईल, त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
साताऱ्यात गणेश मिरवणुकीत 'डीजे'चा वाढला आवाज, पोलिसांनी केली एंट्री; मग पुढे नेमकं घडलं काय? 
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement