सोलापूरमध्ये 'इंजिनिअर' तरुणाचा मोठा कांड; बापालाही केली अटक, गाड्या चोरण्याची पद्धत्त ऐकून पोलीस चकित!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
सोलापुरात दुचाकी चोरीच्या प्रकरणी सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या साहिल शहापूरे या विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून...
सोलापूर : सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाला दुचाकी चोरीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. साहिल महेबुब शहापूरे (वय-22, रा. दक्षिण सदर बाजार, अशोक नगर) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी साहिलसह त्याचे वडील महेबुब शहापूरे आणि चोरीचे भंगार विकत घेणाऱ्या रहीम इरफान शेख या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
8 दुचाकी आणि 3 गाड्यांचे सांगाडे जप्त
पोलिसांनी आरोपीकडून एकूण 8 दुचाकी आणि 3 गाड्यांचे सांगाडे जप्त केले आहेत. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, सदर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीचा तपास सुरू असताना हरिभाई प्रशालेच्या मागे साहिल संशयास्पद रित्या फिरत असल्याचे दिसले. पोलिसांनी त्याला एका दुचाकीसह पकडले. चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता, पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
advertisement
11 गाड्या चोरल्याचे उघड
चौकशीत साहिलने एकूण 11 दुचाकी चोरल्याचे उघड झाले. तो दुचाकी चोरून मित्रांकडे किंवा इतर ठिकाणी ठेवत असे. त्यानंतर तो गाडीचे वेगवेगळे पार्ट करून ते विकायचा, असे पोलिसांनी सांगितले. त्याने चोरी केलेल्या गाड्यांपैकी 6 गाड्या सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून, 2 एमआयडीसी आणि 1 फौजदार चावडी जेलरोज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. अजून एका चोरीचा तपास सुरू आहे.
advertisement
साहिल चोरीच्या गाडीचे पार्ट वेगळे करण्यासाठी बाबू बागवान याला 500 रुपये देण्याचे ठरले होते, पण त्याने त्याला 400 रुपये दिले, ही माहिती तपासात उघड झाली. वडील मेहबुब शहापुरे यांनी गाडीचे पार्ट वेगळे करण्यासाठी जागा वापरू दिली, तसेच चोरीच्या भंगार वस्तू विकत घेतल्याबद्दल रहीम शेख आणि चोरीत मदत केल्यामुळे बाबू बागवान या तिघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
हे ही वाचा : Crime: दारूवरून पेटला वाद, रेल्वेरुळावर आपटलं डोकं, एका मिनिटांत 'त्या' भंगारवाल्याचा खेळ खल्लास!
हे ही वाचा : हाण की बडीव! 2 तृतीयपंथींच्या गटात तुफान हाणामारी; पोलिसांच्याही अंगावर गेले धावून आणि मग...
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 12, 2025 9:02 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
सोलापूरमध्ये 'इंजिनिअर' तरुणाचा मोठा कांड; बापालाही केली अटक, गाड्या चोरण्याची पद्धत्त ऐकून पोलीस चकित!