म्हैसूर ते जोधपूर एक्स्प्रेस
म्हैसूर ते जोधपूर एक्स्प्रेस क्रमांक 06733 ही विशेष गाडी दि. 10 व 17 मार्च रोजी रात्री 9:20 मिनिटांनी म्हैसूर येथून निघेल व जोधपूर येथे गुरुवारी सायंकाळी 5:00 वाजता पोहोचेल. ही गाडी परतीसाठी दि. 14 व 21 मार्च रोजी गाडी क्रमांक 06534 जोधपूर येथून रात्री 11:00 वाजता सुटेल व तिसऱ्या दिवशी सायंकाळी 4:40 वाजता म्हैसूर येथे पोहोचेल. ही गाडी बेळगाव, मिरज, पुणे मार्गे जोधपूरला जाईल.
advertisement
मुंबई-गोवा आता सुपरफास्ट प्रवास, आणखी एक एक्सप्रेस धावणार, जाणून घ्या टाईमटेबल
बंगळुरु ते गोरखपूर एक्स्प्रेस
बंगळुरु ते गोरखपूर विशेष एक्स्प्रेस क्रमांक 06429 ही गाडी दि. 14 व 21मार्च रोजी सायंकाळी 7:00 वाजता बंगळुरु येथून सुटेल व गोरखपूर येथे गुरुवारी सायंकाळी वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी विशेष गाडी क्रमांक 06530 गोरखपूरहून दि.14 व 21मार्च रोजी सायंकाळी 5:00 वाजता सुटेल व सोमवारी सकाळी 8.15 मिनिटांनी बंगळुरुला पोहोचेल. ही गाडी बेळगाव, मिरज, सातारा, पुणे मनमाड, खाडवा, प्रयागराज, वाराणसी या मार्गे धावेल.






