मुंबई-गोवा आता सुपरफास्ट प्रवास, आणखी एक एक्सप्रेस धावणार, जाणून घ्या टाईमटेबल
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mumbai - Goa new Express : मुंबई - गोवा प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता होळीच्या काळात या मार्गावर सुपरफास्ट प्रवास करता येणार असून नवीन एक्स्प्रेस सुरू होणार आहे.
मुंबई: मुंबई ते गोवा प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सणासुदीच्या काळात या मार्गावर प्रवाशांची संख्या वाढत असते. देशात लवकरच होळीचा मोठा सण साजरा होणार आहे. त्यामुळे या काळात मुंबई गोवा प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असणार आहे. याच पार्श्वभूमीवरत मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला असून मुंबई ते गोवा दरम्यान विशेष एक्स्प्रेस चालवण्यात येणार आहे.
मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोव्यातील मडगाव दरम्यान ही विशेष ट्रेन चालवली जाणार आहे. आज आपण या विशेष एक्स्प्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार आहे? याबाबत सविस्तर माहिती घेऊ.
कसं असणार वेळापत्रक ?
मध्य रेल्वे मार्गावर मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस अर्थातच एलटीटी दरम्यान विशेष गाडी चालवली जाणार आहे. गाडी क्रमांक 01104 ही स्पेशल गाडी मडगावहून 16 मार्च 2025 आणि 23 मार्च 2025 रोजी दुपारी साडेचार वाजता रवाना होणार आहे. तसेच, परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 01103 ही स्पेशल गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस अर्थात एलटीटीहून 17 मार्च 2025 आणि 24 मार्च 2025 रोजी सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी रवाना होणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आलीये.
advertisement
कोण कोणत्या स्थानकावर थांबा?
मध्य रेल्वे मार्गावर चालवल्या जाणाऱ्या या विशेष एक्सप्रेस ट्रेनला दोन्ही दिशेने 19 महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. ही गाडी करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे या स्थानकांवर थांबणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
advertisement
दरम्यान, या विशेष एक्सप्रेस ट्रेनमुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून मुंबई ते गोवा हा प्रवास सणासुदीच्या काळात सुपरफास्ट होणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 09, 2025 12:05 PM IST


