नवरात्रोत्सवानिमित्त सांगलीत शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीला गुरूवारपासून सुरुवात झाली. यावेळी धारकऱ्यांना मार्गदर्शन करताना संभाजी भिडे यांनी अनेक बेताल वक्तव्ये केली. सध्याच्या काळातील सण साजरे करणाऱ्याच्या पद्धतीवर त्यांनी यथेच्छ टीका केली.
शिवाजी पार्कवर कोणाचा आवाज घुमणार? दसरा मेळाव्यासाठी BMC ने निर्णय घेतला
मी नवरात्रोत्सवाचा बट्ट्याबोळ होऊ देणार नाही. दुर्गामाता दौडीत सहभागी होण्याची महिलांची इच्छा आहे. त्यांची इच्छा असणे स्वाभाविक आहे. परंतु हे कदापि शक्य नाही. हवे तर त्यांनी स्वतंत्र दुर्गा माता दौड काढावी. पण या दौडमध्ये त्यांना सहभागी होता येणार नाही. हिंदू सणांचा हट्ट्याबोळ आणि वाटोळे होऊ द्यायचे नसेल तर आपल्याला हे करावे लागेल. दौडीचा नाश होता कामा नये, असं संभाजी भिडे म्हणाले.
advertisement
पोलिसांनी दुर्गामाता दौडीत धावलेच पाहिजे. जिल्हा पोलीस प्रमुखांना याबद्दल मी सांगणार आहे. 'चालला चालला लमानांचा तांडा- एका गावाहूनी दुज्या गावाला' असे चालणार नाही. पोलिसांनी दौडीत धावलेच पाहिजे, अशी एक प्रकारची सक्तीही संभाजी भिडे यांनी बोलून दाखवली.
भारतावर आतापर्यंत 76 राष्ट्रांनी आक्रमण केली. हिंदी-चिनी भाई भाई म्हणणारा पंतप्रधान आपल्याला दुर्दैवाने मिळाला. हिंदू मुस्लिम कसले भाई भाई.. शत्रूंना मित्र म्हणता आणि हिंदू हिंदूंमध्ये वैर... असले चालणार नाही. जगातली महामूर्ख जमात म्हणजे हिंदू समाज. राजकारण, सत्ताकारण, अर्थकारण क्षुद्र आहे. हे थुंकण्याच्या लायकीचे विषय आहेत, अशी एकामागून एक वादग्रस्त वक्तव्यांची माळ संभाजी भिडे यांनी लावली.
नवरात्रीत महिला शक्तीला नाकारण्याचा क्षुद्रपणा संभाजी भिडे यांना दाखवला, सामाजिक वर्तुळातून संतापाची लाट
खरे तर नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीची उपासना,स्त्रीमधे असलेल्या अद्भुत शक्तीचा जागर. किंबहुना सत्याच्या विजयाचा, अहंकाराच्या नाश्याचा, नारीशक्तीचा आणि जागृतीचा नवरात्र हा महोत्सव आहे. नवरात्रीत महिला शक्तीचा गौरव केला जातो. पण याच नवरात्रीत महिला शक्तीला नाकारण्याचा क्षुद्रपणा संभाजी भिडे यांना दाखवला आहे. त्यामुळे समस्त महिलांचा अवमान झाल्याची भावना व्यक्त होत आहे. समाजिक राजकीय वर्तुळातून संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त होत आहे.