TRENDING:

Sanjay Shirsat Viral Video : पैशांनी भरलेली बॅग, बनियनवर शिरसाट अन्..., संजय राऊतांच्या व्हिडीओ बॉम्बने खळबळ!

Last Updated:

Sanjay Shirsat Viral Video : शिंदेंच्या आमदाराचे पैशांच्या बँगेसह व्हिडीओ असल्याचा दावा राऊत यांनी केला होता. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. आता हा व्हिडीओ समोर आला असून शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांचा हा व्हिडीओ असल्याचे दिसून येत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे मंत्री आणि आमदारांबाबत सकाळी खळबळजनक दावा केला होता. शिंदेंच्या आमदाराचा पैशांच्या बँगेसह व्हिडीओ असल्याचा दावा राऊत यांनी केला होता. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. आता हा व्हिडीओ समोर आला असून शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांचा हा व्हिडीओ असल्याचे दिसून येत आहे. आधीच आयकराची नोटीस आणि आता व्हिडीओ यामुळे आता शिरसाटांचा राजकीय गेम होणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.
पैशांनी भरलेली बॅग, बनियनवर शिरसाट, संजय राऊतांच्या व्हिडीओ बॉम्बने खळबळ
पैशांनी भरलेली बॅग, बनियनवर शिरसाट, संजय राऊतांच्या व्हिडीओ बॉम्बने खळबळ
advertisement

संजय राऊत काय म्हणाले होते?

एकनाथ शिंदे हे बुधवारी रात्री अचानकपणे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले होते. आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे यांच्या दौऱ्यावर सडकून टीका केली होती. एकनाथ शिंदे यांनी भाजपला ऑफर दिली असून आपल्याला मुख्यमंत्री करा, अशी मागणी देखील केली असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. मुंबईत ईडीच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात उलथापालथ होईल असा दावा राऊत यांनी केला होता.

advertisement

तपास यंत्रणांनी फाईल उघडण्यास सुरूवात केली आहे. शिंदेंच्या लोकांवर आता कारवाई होण्याच्या शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले. नुकतीच आयकर विभागाची नोटीस ज्या मंत्र्याला आली, त्याचा एक व्हिडीओ आपल्याकडे असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. या व्हिडीओत त्या मंत्र्‍याकडे पैशांनी भरलेली बॅग दिसत असल्याचा दावा संजय राऊतांनी केला.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत काय?

advertisement

व्हायरल होणार्‍या व्हिडीओत शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट दिसत आहेत. संजय शिरसाट हे फोनवर बोलत असून बेडवर बसले आहेत. तर, त्यांच्या खोलीत एक मोठी बॅग आहे. या बॅगेत नोटांची बंडले दिसत आहेत.

आरोपांवर शिरसाट काय म्हणाले?

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांनी त्यावर आपले स्पष्टीकरण दिले. संजय राऊत यांचे आरोप हास्यास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. तो व्हिडीओ आपल्या घरातील असून माझा श्वान देखील दिसत असल्याचे सांगितले. मी दौऱ्यावरून आलो होतो, त्यात बॅगेत नोटा नसून कपडे असल्याचे शिरसाट यांनी सांगितले.

advertisement

माझ्या घरात सामान्य कार्यकर्ते, जनतेला प्रवेश असतो. त्यातील एखादा कार्यकर्ता आला असेल आणि उत्सुकता म्हणून व्हिडीओ काढला असेल असेही त्यांनी म्हटले. त्या बॅगेत नोटा नसून आपले कपडे असल्याचा दावा शिरसाट यांनी केला. व्हिडीओ काढणाऱ्यावरही आपला आक्षेप नसल्याचे शिरसाट यांनी म्हटले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sanjay Shirsat Viral Video : पैशांनी भरलेली बॅग, बनियनवर शिरसाट अन्..., संजय राऊतांच्या व्हिडीओ बॉम्बने खळबळ!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल