याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उन्हामुळे केबल स्टेड पुलावरील गतिरोधक काही दिवसांतच उखडले होते. त्यांची दुरुस्ती करण्यासाठी शनिवारी (23 ऑगस्ट) दुपारी 4 ते संध्याकाळी 6 या कालावधीसाठी रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. दुरुस्ती झाल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला.
Mumbai Metro: मुंबईकरांचा प्रवास सुपरफास्ट होणार! डिसेंबरअखेर 4 मेट्रो मार्गिका होणार सुरू
advertisement
कंत्राटदाराला 10 लाखांचा दंड
या केबल स्टेड ब्रीजवरील स्पीड ब्रेकर उखडल्याचं निदर्शनास आल्यानंतर एमएमआरडीएने कंत्राटदार जे. कुमारला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे, अशी माहिती समोर येत आहे. सल्लागार कंपनी पॅडेको इंडिया प्रायव्हेट लिमिटेडलाही हलगर्जीबद्दल 1 लाख रुपये दंड आकारण्यात आला आहे.
एमएमआरडीएने कोट्यवधी रुपये खर्च करून सांताक्रुज-चेंबूर लिंकरोड बांधला आहे. काम पूर्ण झाल्यानंतर 14 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या रस्त्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. या रस्त्यामुळे अमर महल जंक्शन ते वाकोला, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे हा प्रवास केवळ 35 मिनिटांत करणं शक्य झाले. मात्र, लोकार्पणानंतर आठ दिवसांतच हा रस्ता दुरुस्तीसाठी बंद करण्याची वेळ आली.