TRENDING:

Santosh Deshmukh Beed Case: सरपंच संतोष देशमुख प्रकरणात कोर्टात मोठी घडामोड, उज्जवल निकम यांच्याविरोधातच आक्षेप, आरोपींनी नेमंक काय म्हटलं?

Last Updated:

Santosh Deshmukh Case : आजच्या सुनावणीत मोठी घडामोड झाली. विशेष सरकारी वकील अॅड. उज्जवल निकम यांच्यावरच आक्षेप घेण्यात आला.

advertisement
बीड: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला एक वर्ष उलटून गेले आहे. या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि इतरांविरोधात आज कोर्टात आरोप निश्चितीची सुनावणी सुरू आहे. या सुनावणीत मोठी घडामोड झाली. विशेष सरकारी वकील अॅड. उज्जवल निकम यांच्यावरच आक्षेप घेण्यात आला.
सरपंच संतोष देशमुख प्रकरणात कोर्टात मोठी घडामोड, उज्जवल निकम यांच्याविरोधातच आक्षेप, आरोपींनी नेमंक काय म्हटलं?
सरपंच संतोष देशमुख प्रकरणात कोर्टात मोठी घडामोड, उज्जवल निकम यांच्याविरोधातच आक्षेप, आरोपींनी नेमंक काय म्हटलं?
advertisement

उज्जवल निकम यांच्यावर आक्षेप...

संतोष देशमुख हत्या प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली असून, या प्रकरणातील काही आरोपींनी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याबाबत न्यायालयात आक्षेप नोंदवला आहे. वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांना वगळता उर्वरित आरोपींनी उज्ज्वल निकम हे एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचा आरोप करत, त्यांना या प्रकरणातून बाजूला करण्यात यावे, असा अर्ज न्यायालयात दाखल केला आहे. या अर्जामुळे खटल्याला वेगळे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. न्यायाधीशांनी विशेष सरकारी वकील अॅड. उज्जवल निकम यांना याबाबतची माहिती दिल्यानंतर निकम यांनी बाजू मांडली. अॅड. निकम यांनी आरोपींकडून घेण्यात आलेल्या आक्षेपाचा अर्ज फेटाळण्याची मागणी केली.

advertisement

अॅड. उज्जवल निकम यांनी भाजपकडून २०२४ मध्ये मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर केंद्र सरकारच्या शिफारसींवर राष्ट्रपतींनी अॅड. निकम यांची राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून नियुक्ती केली.

दरम्यान, आरोपी क्रमांक दोन विष्णू चाटे याच्या जामीन अर्जावर न्यायालयात सविस्तर युक्तिवाद झाला. चाटे याच्या वतीने सादर करण्यात आलेल्या युक्तिवादात, सुरुवातीच्या दोन एफआयआरमध्ये विष्णू चाटे यांचे नाव नसल्याचा मुद्दा मांडण्यात आला. तसेच, चाटे यांच्यावर यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नसून त्यांचा गुन्हेगारी इतिहास नाही, असा दावा त्यांच्या वकिलांनी केला.

advertisement

यावर सरकारी पक्षाने जोरदार प्रतिवाद केला. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, विष्णू चाटे याने वारंवार आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे खंडणीची मागणी केली होती. तसेच, तो सुरुवातीपासूनच या गुन्ह्यात सक्रिय सहभागी असल्याचे तपासात स्पष्ट झाले असल्याचा दावा सरकारी पक्षाने न्यायालयासमोर केला.

व्हिडीओ द्या, मगच आरोप निश्चिती करा...

आजच्या सुनावणीत संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडीओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. या घटनेदरम्यानचे व्हिडिओ आरोपी वकिलांना देण्यात यावे मग आरोप निश्चिती केली जावी असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला. जे व्हिडीओ ट्रायल कोर्टात नाही ते व्हिडिओ उच्च न्यायालयात दाखवले जातातआणि वातावरण भावनिक केले जात असल्याचा मुद्दा आरोपीच्या वकिलांनी उपस्थित केला. त्यानंतर

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
थंडीचा कडाका अन् चहा प्यायचा नाही? मग घरीच बनवा कॅफे स्टाईल 'हॉट चॉकलेट', Video
सर्व पहा

सरकारी पक्षाकडून आजच आरोपीच्या वकिलांना व्हिडिओज फाइल दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Santosh Deshmukh Beed Case: सरपंच संतोष देशमुख प्रकरणात कोर्टात मोठी घडामोड, उज्जवल निकम यांच्याविरोधातच आक्षेप, आरोपींनी नेमंक काय म्हटलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल