सातारा : सातारा जिल्ह्यातील कोयना धरण (पाटण) पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे वक्र दरवाजे 1 फूट 6 इंच उचलून सांडव्यावरून 10 हजार क्यूसेक्स विसर्ग कोयना नदीपत्रात सोडण्यात आला आहे. कोयना क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस चालू असल्याने धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची वाढ होताना पाहायला मिळत आहे. त्यानुसार संध्याकाळी सांडव्यावरून विसर्गात वाढ करून तो 20 हजार क्यूसेक्स करण्यात येणार आहे.
advertisement
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आठवड्यापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. 74 टक्के पाणी साठा झाला आहे तर 78.29 पीएमसी धरण भरले आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी धरण पायथा विद्युत गृहामधील 1050 क्यूसेक्स विसर्ग दोन दिवसापूर्वी सुरू करण्यात आला आहे.
कोयना धरणातील पाण्याची आवक वाढत असल्यामुळे धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणाच्या वक्र दरवाजे 1 फूट 6 इंच उचलून सांडव्यावरून 10 हजार क्यूसेक्स विसर्ग आणि संध्याकाळी आणखी 10 हजार क्यूसेक्स विसर्ग कोयना नदीपत्रात सोडण्यात येणार आहे आहे. त्यामुळे कोयना धरणातून कोयना नदीमध्ये 21 हजार 50 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होणार आहे. कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.





