Weather Alert: ‘मोंथा’ गेलं अन् वारं फिरलं, पश्चिम महाराष्ट्रात हवापालट, पुणे ते कोल्हापूर शुक्रवारी कोणता अलर्ट?

Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात ऑक्टोबर अखेर मोठे बदल जाणवत आहेत. पुणे ते कोल्हापूर पाच जिल्ह्यांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
1/7
'मोंथा' चक्रीवादळ निवळल्यानंतर कमी दाबाचे क्षेत्र मध्य प्रदेशाकडे सरकत आहे. त्यामुळे राज्यातील काही भागात पावसाला पोषक हवामान आहे. आज 31 ऑक्टोबर रोजी उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. ऑक्टोबर अखेर पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मात्र मोठे बदल जाणवत आहेत. शुक्रवारचा हवामान अंदाज जाणून घेऊ.

advertisement
2/7
पुणे जिल्ह्यात गुरुवारी 29.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.तसेच 20.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज पुणे जिल्ह्यात हलक्या पावसासह आकाश ढगाळ असेल. यावेळी कमाल तापमानाचा पारा 30 अंशावर राहिल.

3/7
मागील 24 तासात सातारा जिल्ह्यात 28.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. 7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज संपूर्ण साताऱ्यासह घाटमाथ्यावर ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यावेळी कमाल तापमानाचा पारा 30 अंशावर राहिल.

4/7
कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी 28.2 अंश सेल्सिअस तापमानाची आणि 7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात कोल्हापूरसह घाटमाथ्यावर ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता आहे. यावेळी पारा 27 अंशावर राहील.

5/7
गेल्या 24 तासात सोलापूर जिल्ह्यात 32.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी पारा 29 अंशावर राहण्याचा अंदाज आहे.

6/7
सांगली जिल्ह्यात मागील 24 तासात 29.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच 9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज जिल्ह्यात ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यावेळी पारा 30 अंशावर राहण्याचा अंदाज आहे.

7/7
आज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता आहे. पुणे ते कोल्हापूर पाचही जिल्ह्यांतील हवामानात बदल जाणवत आहेत. पावसाचा जोर ओसरला असून नोव्हेंबरच्या सुरुवातीला ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता आहे. मात्र, जोरदार पावसाचा अलर्ट नाही.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement