Satara Doctor: 'मला फक्त एक रात्र राहू द्या', डॉक्टर तरुणीची विनवणी, रात्री दीड वाजता हॉटेलमध्ये काय घडलं? नवा खुलासा
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Satara Woman Doctor Death Case: सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी दररोज नवनवी माहिती समोर येत आहे. आता हॉटेलमधला घटनाक्रम समोर आला आहे.
Satara Woman Doctor Death Case: सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी दररोज नवनवी माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी निलंबित पीएसआय गोपाल बदणे आणि प्रशांत बनकरला अटक केली आहे. त्यांची कसून चौकशी सुरू असून त्यांच्याकडून खळबळजनक माहिती प्राप्त होत आहे. आता घटनेच्या रात्री जेव्हा तरुणी घरातून निघून गेली. तेव्हा हॉटेलमध्ये नक्की काय घडलं याचा घटनाक्रम समोर आला आहे. शिवाय याबाबतचा सीसीटीव्ही व्हिडीओ देखील समोर आला आहे.
संबंधित महिला डॉक्टर ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी थांबली होती, त्या हॉटेलचे संचालक रणजीत भोसले यांनी सगळा घटनाक्रम सांगितला आहे. २३ ऑक्टोबरच्या मध्यरात्री नक्की काय घडलं? याची सविस्तर माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
भोसले यांनी सांगितले की, रात्री १ वाजून २३ मिनिटांनी एक महिला डॉक्टर दुचाकीवरून हॉटेलच्या गेटवर आली. ती एकटीच होती. सुरक्षारक्षकाला तिने सांगितले, “मी बारामतीला चालले आहे, पण रस्ता लांब आहे. मी एकटीच आहे, मला फक्त एक रात्र राहू द्या.” तिच्या विनंतीनंतर सुरक्षा रक्षकाने गेट उघडले. केवळ तीन मिनिटांत ती स्वागत कक्षात पोहोचली. तिने स्वतःच रजिस्टरमध्ये नाव नोंदवले, आधार कार्ड दिले आणि “पेमेंट सकाळी करते” असं सांगितले. त्यानंतर ती रात्री १ वाजून ३० मिनिटांनी रूम नंबर ११४ मध्ये गेली.
advertisement
रुममध्ये १७ तास स्मशानशांतता
सकाळी निघणार असल्याचे तरुणीने सांगितले होतं. मात्र, त्यानंतर तब्बल १७ तास हॉटेलमधून कोणतीही हालचाल दिसली नाही. सकाळी ११ वाजेपर्यंत खोलीचे दार न उघडल्याने मॅनेजरने दार ठोठावले, पण प्रतिसाद मिळाला नाही. दुपारी आणि सायंकाळी पुन्हा प्रयत्न करण्यात आले तरी काही हालचाल नव्हती. शेवटी सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी, संचालक रणजीत भोसले यांच्या उपस्थितीत डुप्लिकेट चावीने दार उघडण्यात आले, आणि संपूर्ण प्रक्रिया व्हिडीओमध्ये रेकॉर्ड करण्यात आली. आतमध्ये महिला डॉक्टर पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्या. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ देखील समोर आला आहे. ज्यात महिला डॉक्टर एकट्याच हॉटेलमध्ये जाताना दिसत आहे.
view commentsLocation :
Phaltan,Satara,Maharashtra
First Published :
October 30, 2025 11:55 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Satara Doctor: 'मला फक्त एक रात्र राहू द्या', डॉक्टर तरुणीची विनवणी, रात्री दीड वाजता हॉटेलमध्ये काय घडलं? नवा खुलासा


