सातारा : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. महाबळेश्वर, वाई, जावली, सातारा , कराड, पाटण तालुक्यात 2 दिवसापासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पश्चिमेकडील जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही भागात पावसामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामध्ये ओढ्याच्या बाजूला लावलेले चारचाकी वाहन पाण्यामध्ये वाहून गेले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
advertisement
काही काळानंतर हे वाहन सुखरूप ओड्याच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आली आहे. महाबळेश्वरमध्ये रविवारी एकाच दिवशी तब्बल 140.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर मेहू धरणातून 600 क्युसेक पाणी सोडण्यात आले. जिल्ह्यात शहरासह अनेक तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. सतत जोरदार पावसाच्या सरी कोसळल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी दिसत आहे. तसेच डोंगराळ भागात पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे. दुसरीकडे सकल भागात पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. दिवसभर झालेल्या पावसामुळे नाले, ओढे, छोटी तळी, दुतडी भरून वाहत आहेत.
पावसाळ्यात ही भाजी खाण्यापूर्वी सावधान! काळजी घ्या, अन्यथा क्षणार्धात जाऊ शकतो जीव
सातारा जिल्ह्यात झालेल्या पावसाची आकडेवारी -
सातारा 7.3 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे.
जावली - 28.3 मिमी
पाटण 24.1 मिमी
कराड 16.3 मिमी
कोरेगाव 3.8 मिमी
खटाव 3.5 मिमी
मान 0.9 मिमी
फलटण 0.7 मिमी
महाबळेश्वर 89.7 मिमी
खंडाळा 1.3 मिमी
वाई 17.6 मिमी
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर मोठा असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर कोयना धरण पाणी क्षेत्राच्या पावसाचा जोर कायम आहे. रविवारी सायंकाळी पर्यंत धरणात 54 हजार 249 क्युसेक पाणी जमा झाले. प्रशासनाच्या माध्यमातून डोंगरी भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.