पावसाळ्यात ही भाजी खाण्यापूर्वी सावधान! काळजी घ्या, अन्यथा क्षणार्धात जाऊ शकतो जीव
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
मान्सूनचं आगमन झालं की जंगलात जंगली मशरूम वाढू लागतात. मशरूम विकण्यासाठी ग्रामीण भागातील लोक शहरातील बाजारपेठेत पोहोचतात. मशरूमच्या 20 पेक्षा जास्त प्रजाती बाजारात पाहायला मिळतात. अशा परिस्थितीत कोणते मशरूम खावे? असा मोठा पेच ग्राहकांसमोर असतो.
advertisement
advertisement
मशरूममध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. याचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेले कॅल्शियम हाडे आणि स्नायूंना मजबूत करते. परंतु लोकांनी माहिती नसताना त्याचे सेवन करण्याऐवजी त्याच्या पर्यायी भाज्यांचे सेवन करावे, असेही आरोग्य अधिकारी सांगतात.
advertisement
advertisement