TRENDING:

Satara : चिमुकल्या ओवीची मृत्यूशी झुंज अपयशी, दुर्गादेवी मिरवणुकीत जनरेटरच्या स्फोटात झाली होती जखमी

Last Updated:

दुर्गादेवीच्या मिरवणुकीमध्ये महाबळेश्वर येथील कोळी आळी येथे मिरवणुकीच्या दरम्यान जनरेटरचा स्फोट झाला होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सातारा, 11 नोव्हेंबर : सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरमध्ये दुर्गादेवीच्या मिरवणुकीवेळी भीषण दुर्घटना घडली होती. देवीच्या मिरवणुकीमध्ये डिजेसाठी आणलेल्या जनरेटरचा मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात अनेक जण जखमी झाले होते. त्यात गंभीररित्या भाजलेल्या चिमुकल्या ओवीची १५ दिवस मृत्यूशी झुंज सुरू होती. पुण्यातील रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला.
News18
News18
advertisement

दुर्गादेवीच्या मिरवणुकीमध्ये महाबळेश्वर येथील कोळी आळी येथे मिरवणुकीच्या दरम्यान जनरेटरचा स्फोट झाला होता. स्फोटात महाबळेश्वर येथील सहा ते सात लहान मुलं भाजुन‌ जखमी झाली होती. त्यापैकी गेले कित्येक दिवस मृत्यूशी कडवी झुंज देणारी ओवी वय वर्ष सात हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्यावर पुणे येथील सूर्या सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू होते. महाबळेश्वर आणि कोळी आळीमध्ये दुखा:चा डोंगर कोसळला आहे.

advertisement

Nagpur Crime News : नुकत्याच निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्याची निर्घृण हत्या; नागपूर हादरलं

काय घडलं होतं?

महाबळेश्वरमधील कोळी आळी इथं दुर्गा माता मंडळाची विसर्जन मिरवणूक सुरू होती. त्यात डिजेसाठी आणलेल्या जनरेटरच्या पाइपला गळती लागली होती. पेट्रोलच्या गळतीने अचानक पेट घेऊन मोठा स्फोट झाला होता. यावेळी दुर्गा देवीच्या मुर्तीजवळ बसलेली लहान मुले होरपळली होती. यात चार ते ८ वर्षांच्या चिमुकल्यांचा समावेश होता.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
Satara : चिमुकल्या ओवीची मृत्यूशी झुंज अपयशी, दुर्गादेवी मिरवणुकीत जनरेटरच्या स्फोटात झाली होती जखमी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल