Nagpur Crime News : नुकत्याच निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्याची निर्घृण हत्या; नागपूर हादरलं
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
नागपूर, 11 नोव्हेंबर, उदय तिमांडे : नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. कामगारांंनीच ढाबा मालकाची हत्या केली आहे. नागपूर जिल्ह्यातील पाचगावमधील ही घटना आहे. राजू डेंगरे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं आहे. राजू डोंगरे हे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप समर्थित उमेदवार म्हणून निवडून आले होते. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नागपूरच्या पाचगावमध्ये ढाबा मालकाची हत्या करण्यात आली आहे. या प्रकारानं परिसरात खळबळ उडाली आहे. राजू डोंगरे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. राजू डोंगरे यांचा ढाबा आहे. रात्री झालेल्या वादातून हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांनीच लाठ्या -काठ्या आणि दगडाने हल्ला करून डोंगरे यांची हत्या केली. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राजू डेंगरे भाजप समर्थित उमेदवार म्हणून निवडून आले होते.
advertisement
आरोपी पोलिसांच्या ताब्यात
दरम्यान डोंगरे यांचा खून करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. वाद नेमका कोणत्या कारणातून झाला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. घटननेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Location :
Nagpur,Nagpur,Maharashtra
First Published :
November 11, 2023 12:32 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
Nagpur Crime News : नुकत्याच निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्याची निर्घृण हत्या; नागपूर हादरलं