सातारा : राज्यात 17 हजार 471 पदांसाठी पोलीस भरती प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. या रिक्त पदांसाठी तब्बल 17 लाख 76 हजार 256 अर्ज आले आहेत. त्याच अनुषंगाने सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने 235 पदांसाठी 19 जून रोजी सकाळी सात वाजल्यापासून ते सायंकाळी उशीर पर्यंत ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
advertisement
पोलीस कवायत मैदानावर ही पोलीस भरती प्रक्रिया होणार आहे. सातारा जिल्हा पोलीस दलातील 235 पदासाठी, तब्बल 1 लाख 3 हजार 30 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी येत असताना कोण कोणती कागदपत्रे आणावीत, अडचण आल्यास कोणाशी संपर्क साधावा, याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी सातारा जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याशी संवाद साधला.
कोणत्या पदांसाठी होतेय भरती -
यावेळी त्यांनी सांगितले की, सातारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने 235 पदांसाठी 19 तारखेला बुधवार पासून भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सातारा पोलिस दलात 235 पदांमध्ये 39 पदे ही चालक पदासाठी आहेत. तर पोलीस कॉन्स्टेबल व बँड वादकांसाठी एकूण 196 पदे आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून ते सायंकाळी उशिरापर्यंत भरती प्रक्रिया चालेल. साताऱ्यातील पोलिस कवायत मैदानावर ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. सातारा पोलिस दलातील विविध पदांसाठी तब्बल 1 लाख 3 हजार ३० उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.
पावसाळ्यात ताडपत्रीची चिंता, याठिकाणी मिळणार दर्जेदार उत्पादन, जाणून घ्या, दर अन् ठिकाण
कोणती कागदपत्रे सोबत न्यावीत -
उमेदवारांनी ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्याची प्रवेशपत्र त्यांना तत्काळ दिले जाणार आहे. शैक्षणिक कागदपत्रे तपासण्यासाठी 4 टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. शैक्षणिक प्रमाणपत्रांचे 2 झेरॉक्स संच, 6 पासपोर्ट साईज फोटो आणि जात प्रमाणपत्र या भरतीसाठी अनिवार्य आहे.
पोलीस अधीक्षकांचे आव्हान -
उमेदवारांनी साताऱ्यासह अन्य जिल्ह्यांमध्ये प्रवेश भरतीसाठी अर्ज केला असल्यास आणि एकाच दिवशी अन्य ठिकाणची मैदानी चाचणी असल्यास त्या उमेदवारांना दुसरी तारीख देण्यात येईल. असे कोण उमेदवार असतील त्यांनी तत्काळ कळवावे, असे आव्हानही पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी उमेदवारांना केले आहे.
मुलाने सांभाळण्यास दिला नकार, 70 वर्षीय आईला सोडलं बेवारस, पोलिसांना माहिती झालं आणि…
त्याचबरोबर कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी, तसेच 1600 मीटर धावणे, 100 मीटर धावणे व गोळाफेक अशा निकषांमधून पार पडलेल्या उमेदवारांची पोलीस दलाच्या संकेतस्थळावर गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
बाहेरुन येणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय -
बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या युवकांच्या निवासाची गैरसोय मोठ्या प्रमाणात होते. त्यासाठी पोलीस करमणूक केंद्राचा हॉल, शाहू स्टेडियम या ठिकाणी मैदानी चाचणीच्या एक दिवस अगोदर निवासाची सोय करण्यात आली आहे. पोलिस दलाने केलेल्या या उपाययोजनेमुळे गरजू मुलांची गैरसोय दूर होणार आहे. जर कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास सातारा जिल्ह्यातील हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधण्याचे देखील आव्हानही सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केला आहे.