सातारा: सध्या राज्यातील विविध भागात मान्सूनपूर्व पावसाचा जोर आहे. सातऱ्यातील विविध ठिकाणी गेल्या काही दिवसांत वादळी पावासने हजेरी लावली. यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. तर काही ठिकाणी वीज पडल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. अशाच आस्मानी संकटात फलटण तालुक्यातील मेंढपाळाचं मोठं नुकसान झालंय. वाई तालुक्यातील पसरणी येथे वीज पडून 50 बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर 50 हून अधिक बकऱ्या बेपत्ता आहेत.
advertisement
शेतकऱ्यावर आस्मानी संकट
सातारा जिल्ह्यातील विविध भागात जोरदार वादळी पाऊस झाला. वाई व परिसरात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. मेंढपाळ जगन्नाथ श्रीपती कोळेकर हे मूळचे फलटण तालु्कयातील नांदलचे आहेत. गेल्या 40 वर्षांपासून ते दरवर्षी बकऱ्या चारण्यासाठी वाई परिसरात येतात. परंतु, यंदा बकऱ्या चारायला घेऊन गेले असतानाच आस्मानी संकट कोसलळं आणि त्यात त्यांचे दहा लाखांहून अधिक नुकसान झाले आहे.
दुष्काळी माणमध्ये फुलवली वनराई, साताऱ्याच्या वनरक्षितेची कमाल, Video पाहून तुम्ही कराल कौतुक
वडाच्या झाडावर पडली वीज
वाई परिसरात विजांचा कडकडाटासह सोसाट्याचा वाराही सुटला होता. सुमारे तासभर पाऊस सुरू होता. या काळात कोळेकर बकऱ्या चारण्यासाठी डोंगरात गेले होते. गावातील नवाब बंगल्याच्या मागील बाजूस ट्याळमुखाच्या पायथ्याला वडाचं झाड आहे. त्याठिकाणी पावसात सगळ्या बकऱ्या जमा झाल्या होत्या. यावेळी वीज पडल्याने 50 बकऱ्या जागेवरच मृत झाल्या. तर वीज पडलेली पाहून 50 हून अधिक लहान मोठ्या बकऱ्या अस्ताव्यस्त पळाल्या. अचानक आलेल्या पावसाने काही बकऱ्या पाण्यात वाहून गेल्या. तर काही बंधाऱ्याच्या गाळात अडकल्या. या बकऱ्यांची शोध मोहीम सुरू आहे.
दुष्काळी पट्ट्यात उगवलं सोनं, सातारचा शेतकरी आवळ्यातून लखपती!
मेंढपाळ कोळेकर हतबल
पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलेल्या मेंढ्याचं डोळ्यासमोर होत्याचं नव्हतं झालं. अचानक वीज पडून 50 हून अधिक मेंढ्या जागीच मृतावस्थेत पडल्याचं पाहून कोळेकर यांनी अक्षरश: टाहो फोडला.याबाबत ग्रामस्थांना माहिती मिळतात त्यांनी तातडीने डोंगराकडे धाव घेतली. वाईच्या तहसीलदार सोनाली मेटकरी, नायब तहसीलदार, पशुधन विकास अधिकारी यांनीही घटनास्थळी येऊन पाहणी केली. तसेच मेंढपाळ कोळेकर यांना धीर दिला.





