TRENDING:

50 गुंठ्यात केली कढीपत्त्याची लागवड, वर्षाला 10 लाखांची कमाई, साताऱ्याच्या शेतकऱ्याचा सातासमुद्रपार डंका

Last Updated:

सध्याच्या घडीला शेतकरी हे शेतात नवनवीन प्रयोग करत असतात. असाच एक प्रयोग साताऱ्यातील शेतकरी हणमंत कूचेकर यांनी केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शुभम बोडके, प्रतिनिधी 
advertisement

सातारा : सध्याच्या घडीला शेतकरी हे शेतात नवनवीन प्रयोग करत असतात. असाच एक प्रयोग साताऱ्यातील शेतकरी हणमंत कूचेकर यांनी केला आहे. त्यांनी आपल्या शेतामध्ये कढीपत्त्याची लागवड केली आहे. यामधून वर्षाला ते लाखो रुपयांची कमाई करत असून त्यांच्या कढीपत्त्याला सातासमुद्रपार मागणी आहे. त्यांनी हा कढीपत्त्याच्या शेतीचा प्रयोग कसा यशस्वी केला जाणून घेऊया.

advertisement

कशी केली शेती? 

शेतकरी हणमंत कूचेकर यांनी 2011 साली कढीपत्त्यामधील DWD2 सुवासिनी प्रकारच्या जातीच्या कढीपत्त्याची 50 गुंठ्यात लागवड केली. दरम्यान एक वर्ष पूर्णपणे त्याची जोपासना केली. कढीपत्त्याची पहिली हार्वेस्टिंग झाल्यानंतर ओला कढीपत्ता पुणे-मुंबई येथील व्यापाऱ्यांना विकण्यास सुरुवात केली. परंतु हणमंत कुचेकर यांना असं जाणवलं की व्यापारी आपल्या मालावर जर कमवत असतील आपण आपल्या मालावर प्रोसेसिंग करून आपण का कमवू शकत नाही ? हाच ध्यास मनात ठेवत शेतकरी हणमंत कुचेकर यांनी कृषी विभाग आत्मा यांच्याशी संपर्क साधून सबसिडीवर सोलर ड्रायर घेतला आणि कढीपत्ता धुऊन कढीपत्त्याची पाने सोलर ड्रायरवर वाळवण्यास सुरूवात केली.

advertisement

View More

महिन्याला कमावतात तब्बल 2 लाख रुपये नफा, बीडमधील व्यक्ती नेमकं काय करतोय?, VIDEO 

दरम्यान वाळवलेल्या कढीपत्त्याची पाने सुरुवातीला हणमंत कूचेकर मिक्सरमध्ये बारीक पावडर तयार करत स्वतःचा व्यवसाय सुरू करून तालुकास्तरीय जिल्हास्तरीय कृषी मेळावे तसेच प्रदर्शने यामध्ये विक्री करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तयार केलेल्या मालाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाल्यानंतर उत्पादन क्षमता कमी पडल्याने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतून घेतलेल्या कर्ज मधून पाचशे ते हजार किलोच्या क्षमतेच्या मशिनरी घेऊन व्यवसायाची वाढ होण्यास सुरुवात केली. दरम्यान आधुनिक यंत्रणांचा वापर करत इंटरनेटच्या साह्याने स्वतःची व्यवसायाची वेब साईट तयार केली. वेबसाईट तयार केल्यामुळे परदेशातील ग्राहकांनी स्वतः परदेशातून येऊन हणमंत कुचेकर यांच्या शेतीला भेट दिली. तर परदेशातील ग्राहकांनी मोठमोठ्या ऑर्डर देण्यास सुरुवात केली.

advertisement

तरुणानं नोकरी सोडली अन् शेतात लावलं कोरफड, आता करतोय कोट्यवधींची उलाढाल

परदेशात कढीपत्त्याची निर्यात

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांनो सावधान! कॉल फॉरवर्डिंगमधून बँक खात होऊ शकतं रिकामं; अशी घ्या काळजी
सर्व पहा

कढीपत्त्यामध्ये नैसर्गिक गुण आहे. सहजासहजी लोक कढीपत्ता खात नाही उलट तो कढीपत्ता जेवणामधून बाहेर काढून टाकला जातो. पण कढीपत्त्यामध्ये असणारे लोह, मिनरल, कॅल्शियम हे घटक असतात हे घटक काढून टाकू नये यासाठी शेतकरी हनुमंत कुचेकर यांनी आपल्या कल्पनेनुसार पावडर फोममध्ये माणसाच्या शरीरामध्ये कढीपत्ता कसा उपयोगाला येईल याचा प्रयत्न केला आहे. नुसता कडीपत्ता नव्हे तर कढीपत्ता चटणी, सफरचंद पावडर, केळी पावडर अशा प्रकारचे पावडर तयार करून युके, टांझानिया, एरोबिया आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये आज रोजी निर्यात करत आहेत. तसेच निर्यात करत असताना दर 3 महिन्याला पाचशे किलो कढीपत्ता पावडर म्हणजे 25 टन ओला कढीपत्ता ट्रान्सपोर्ट करतात. परदेशात ट्रान्सपोर्ट केल्यानंतर कढीपत्त्याचा जो दर आहे तो पाच ते सात पटीने वाढीव दर मिळत असतो. मला संपूर्ण व्यवसायामध्ये वार्षिक उत्पन्न संपूर्ण खर्च वगळता 10 लाख रुपये होत असल्याची माहिती शेतकरी हणमंत कुचेकर यांनी दिली.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
50 गुंठ्यात केली कढीपत्त्याची लागवड, वर्षाला 10 लाखांची कमाई, साताऱ्याच्या शेतकऱ्याचा सातासमुद्रपार डंका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल