सातारा : घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचा नारा देत सर्वसामान्य माणसाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचा प्रयत्न केला. त्याची उतराई म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर अनेक साहित्य तयार झालेत. साताऱ्यातील येथील रिपब्लिकन चळवळीचे कार्यकर्ता आदित्य गायकवाड यांनी स्वतःच्या कंठावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची इंग्लिश भाषेतील सही गोंदून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खऱ्या अर्थाने अभिवादन केले आहे.
advertisement
का गोंदली सही?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की साताऱ्यातील प्रतापसिंह हायस्कूलची आठवण होते. बाबासाहेबांनी त्यांच्या प्राथमिक शिक्षणाची सुरुवात साताऱ्यातल्या प्रताप सिंह हायस्कूल मधून केली होती. त्याच भूमीत आदित्य गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक गीते कविता जलसा कार्यक्रम पाहिले होते. त्यावेळी त्यांच्या मनावर एका गाण्याचे बोल उमटले 'आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे' असे त्या गाण्याचे बोल होते. या गाण्याचा आदर्श घेत आपण महामानवाचे गीत आपल्या आवाजाने म्हणू शकत नाही परंतु जर आपल्या कंठावर त्यांची काही तरी निशाणी असावी या भावनेतून त्यांनी स्वतःच्या कंठावर बी.आर.आंबेडकर अशी इंग्रजी भाषेतील सही गोंदून घेतली.
आर्थिक परिस्थितीमुळे खेळू शकला नाही कराटे; आता पुण्यातील गोर गरीब मुलांना तरुण देतोय धडे PHOTOS
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो रथ घेऊन चालले होते. तो रथ असाच आपण पुढे घेऊन जाणार आहोत. या गोष्टीची आठवण यावी आणि शेतकरी कष्टकरी दलित यांच्यावर कोणत्याही अन्याय होऊन नये यासाठी सदैव आम्ही सज्ज आहोत. याची आठवण करून देण्यासाठी म्हणून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सही कंठावर गोंदली आहे ,असे आदित्य गायकवाड यांनी सांगितले आहे.