शहापूर योजनेसाठी महावितरणच्या शेंद्र उपकेंद्रातून वीजपुरवठा होतो. हा वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. त्यामुळे पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड होऊन शहापूरचा पाणीपुरवठा सातत्याने विस्कळीत होत आहे. तर कास योजनेच्या नवीन जलवाहिनीचे काम प्रगतिपथावर आहे. मात्र, जुन्या जलवाहिनीला वारंवार गळती लागत आहे. त्यामुळे कासमधूनही पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होत नाही.
सर्दी, खोकल्यानं झालात हैराण?, नागवेलीचं पान आहे रामबाण उपाय, अनेक समस्यांवर फायदेशीर
advertisement
दरम्यान, शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाने वीजपुरवठ्यातील दोष दूर करून जलवाहिनीची गळती काढण्याचे काम केले जाणार आहे. या कामामुळे कास आणि शहापूर योजनेच्या पाणीपुरवठ्यात आठवड्यातून एक दिवस कपात केली जाणार आहे. पालिकेने याबाबत वेळापत्रक तयार केले असून 16 ऑगस्टपासून पाणीकपात सुरू होणार आहे.
पाणी कपतीचे वेळापत्रक
कास योजना
सोमवार: भैरोबा टाकी, मंगळवार: व्यंकट पुरा टाकी, बुधवार: कात्रे वाडी टाकी आणि घटेवाडी, गुरुवार: गोल टाकी मेन लाईन (निळी, दुसरा झोन सकाळी सात ते आठ), शुक्रवार: मेन लाईन गोल टाकी ( निळी पहिला झोन) सकाळी सहा ते सात, शनिवारी: कोटेश्वर टाकी, रविवारी: कोपरी लाईन, गुजर आळी लाईन गुरुकुल टाकी
शहापूर योजना
सोमवार: यशवंत गार्डन टाकी, मंगळवार: घोरपडे टाकी, बुधवार: गणेश टाकी, गुरुवार: राजवाडा टाकी, शुक्रवार: गणेश टाकी, शनिवार: सकाळ सत्र, देवी चौक घांटवरी, रविवार: घोरपडे टाकी (सकाळ सत्र)






