सर्दी, खोकल्यानं झालात हैराण?, नागवेलीचं पान आहे रामबाण उपाय, अनेक समस्यांवर फायदेशीर
- Reported by:Shubham Sharad Bodake
- local18
- Published by:Khushalkant Dusane
Last Updated:
नागवेलीची पान हे सर्दी खोकला कमी करण्यास मदत करते. दमा आणि श्वसन विकारांसाठीही नागवेलीची पाने उपयुक्त ठरतात.
शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा : नागवेलीच्या पानाचे अनेक पारंपारिक आणि औषधी महत्त्व आहे. नागवेलीची पाने हे विविध संस्कृतीमध्ये आणि आयुर्वेदामध्ये औषधी गुणधर्मासाठी वापरली जातात. नागवेलीचे पानांना काही भागात खाऊचे पान म्हणूनही ओळखले जाते. या खाऊच्या पानांना फारसे लांब कोठे शोधण्यासाठी जावं लागत नाही. अलीकडच्या काळात अनेक जण आपल्या घराच्या बागेमध्ये किंवा कुंड्यांमध्येही या पानांचा वेल लावतात.
advertisement
शेकडो, हजारो वर्षांपासून आयुर्वेदामध्ये या पानांचा औषधी गुणधर्मासाठी वापर केला जातो. लहान मुलांना सर्दी खोकला पळवून लावायचा असेल तर अनेकदा ही पानं खाण्याचा सल्ला आयुर्वेदिक तज्ञ, डॉक्टर देतात. लहान मुलांना ही पाने कशी खायला द्यावीत, याचा वापर कोणत्या उपचारावर केला जातो, तसेच याचे सेवन कसे करावे, याबाबतची माहिती आपण आज जाणून घेऊयात.
advertisement
आयुर्वेदिक तज्ञ डॉ. शुभदा गुंजाळ चोखंडे यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 च्या टीमशी बोलताना त्यांनी सांगितले की, नागवेलीला काही भागात लोक खाऊची पाने म्हणून ओळखतात. या पानांना आयुर्वेदिक दृष्ट्या महत्त्व असले तरी ते शोधण्यासाठी फारसे लांब कोठे जाण्याचे आवश्यकता नाही. कारण आपणाकडे तिला धार्मिक अधिष्ठानही मिळालेले आहे. घरात कोणतीही पूजा असल्याने सर्वात प्रथम खाऊची पाने आणली जातात. त्यामुळे सहज मिळत असल्याने या पानांचा उपयोग घेता येतो. अनेक जण आता आपल्या घराच्या कुंड्यांमध्येही खाऊच्या पानांचा वेल लावून ती पाने आपल्या घरामध्ये मोठी करत आहेत.
advertisement
स्थापत्यशैलीचा अद्भुत नमुना, माणकेश्वर येथील प्राचीन महादेव मंदिर, VIDEO
नागवेलीची पान हे सर्दी खोकला कमी करण्यास मदत करते. दमा आणि श्वसन विकारांसाठीही नागवेलीची पाने उपयुक्त ठरतात. गरम पाण्यात काढा करून घेतल्याने श्वास मार्ग मोकळा होतो. लहान मुलांना सर्दी, खोकला झाल्यास नागवेलीच्या पानांला तिळाचे तेल लावून थोडे कोमट करून ते मुलांच्या छातीवर ठेवले तर कफ सुटण्यास मदत होते.
advertisement
अनेक आजारांवर उपचार फक्त एकच, नागवेलीची पाने -
नागवेलीचे पान चघळल्याने पचनक्रिया सुधारते. तोंडाला चव नसणे, घसा खवखवणे, यावरही हे पान उपयुक्त आहे. यामध्ये अँटीसेप्टिक अँटिबायोटिक आणि फंगल गुणधर्म आहेत. त्यामुळे हे पान त्वचेच्या इन्फेक्शनवर आणि जखमांवर प्रभावी व गुणकारक आहे. नागवेलीचे पान चघळल्याने तोंडातील दुर्गंधी दूर होते. त्यामुळे तोंडातील जंतू नष्ट होतात व दात हिरड्या मजबूत होतात, असेही त्यांनी सांगितले.
advertisement
नागवेलीची हिरवीगार ताजी पाने स्वच्छ धुऊन एका कापडाने पुसून घ्यावे आणि त्याच्या शिरा आणि देठ काढून त्याला चुना, काथा, वेलदोड्याची दोन दाणे, घरी केलेला सुपारी, बडीशेप, गुलकंद, सुके आणि ओले खोवलेले खोबरे, लवंग लावून विडा बनवला जातो. हा विडा विशेष म्हणजे आजी आजोबांचा पानपुडा. म्हणून त्याची ओळख आपल्या घरात आहे.
advertisement
नागवेलीची पाने म्हणजेच खाण्याचे पान किंवा विड्याचे पान आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जेवणानंतर पान खाण्याचे अनेकजण शौकीन असतात. त्यामुळे तोंडाची चव वाढते. पान खाल्ल्याने की तोंडातील अनेक जीवाणूंचा प्रभावीपणे सामना केला जातो. यामुळे तोंडाला दुर्गंध येत नाही. तसेच दात पोकळी, दात किडणे यांचा त्रास कमी होतो. जेवणानंतर पानाचा विडा किंवा नुसते पान चावून खाल्ल्याने आतड्या निरोगी राहतात. आरोग्यासोबतच ते सौंदर्य वाढवण्यातही फायदेशीर ठरते, असेही त्यांनी सांगितले.
सूचना - वर दिलेली माहिती आरोग्यतज्ञांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
Aug 12, 2024 7:13 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
सर्दी, खोकल्यानं झालात हैराण?, नागवेलीचं पान आहे रामबाण उपाय, अनेक समस्यांवर फायदेशीर








