Weight loss : वाढत्या वजनाला लावा ब्रेक, फक्त 'ही' गोष्ट करा आणि राहा टेन्शन फ्री
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
आपल्यालाही जर आपल्या वजन जशास तसे ठेवायचे असेल, आपण आपले वजन कसे ठेवावे, त्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारचा आहार घ्यायला हवा, आपल्या आहारामध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश करायला हवा, याविषयी अलका कर्णिक यांनी सविस्तर माहिती दिली.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिला पॅरिस ऑलिम्पिक 2024 या क्रीडा स्पर्धेत बाद ठरवण्यात आले. 50 किलोग्रॅम वजनी गटातील सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी निर्धारित मानकांपेक्षा 100 ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे विनेशवर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, यानंतर आता वजनाबाबत विविध प्रकारची चर्चा होत आहे.
आपल्यालाही जर आपल्या वजन जशास तसे ठेवायचे असेल, आपण आपले वजन कसे ठेवावे, त्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारचा आहार घ्यायला हवा, आपल्या आहारामध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश करायला हवा, याविषयी अलका कर्णिक यांनी सविस्तर माहिती दिली.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, जर तुम्हाला तुमचे वजन जशास तसे ठेवायचे असेल तर सर्वप्रथम तर तुमची पचनसंस्था ही चांगली असायला हवी. पचनसंस्था चांगली असेल तर वजन नियंत्रणामध्ये ठेवायला मदत होते. त्यासोबतच तुमची झोपदेखील व्यवस्थित होणे गरजेचे आहे. तुम्ही दररोज किमान 8 तास तरी झोप घेणे गरजेचे आहे. तसेच आहारामध्ये कडधान्य, फळांचा ज्यूस याचा समावेश करायला हवा. या सर्व गोष्टींचा समावेश जर असेल तर वजन नियंत्रणात राहायला मदत होते.
advertisement
त्यासोबतच तुमच्या आहारामध्ये विटामिन फायबर प्रोटीन कार्बोहायड्रेट यांचा समावेश असायला हवा. संतुलित आहार असायला हवा. त्यासोबतच तुम्ही दररोज वर्कआउट करणेही गरजेचे आहे. दररोज वॉकिंग करणेही गरजेचे आहे. त्यासोबतच तुम्ही दररोज व्यायाम करण्याची गरज आहे. त्यासोबतच लिंबूपाणी दररोज तुम्ही तुमच्या आहारा घ्यायला हवे. तसेच जेवणाच्या वेळा पाळणे गरजेचे आहे. वेळेवर जेवण करणे आवश्यक आहे.
advertisement
या सर्व गोष्टींचा समावेश जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये केला तर तुमचे वजन नियंत्रणात राहण्यामध्ये मदत होते. हे सर्व करणे गरजेचे आहे, अशी माहिती आहारतज्ञ अलका कर्णिक यांनी सांगितले.
सूचना - वर दिलेली माहिती आरोग्यतज्ञांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
August 12, 2024 2:35 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Weight loss : वाढत्या वजनाला लावा ब्रेक, फक्त 'ही' गोष्ट करा आणि राहा टेन्शन फ्री