स्थापत्यशैलीचा अद्भुत नमुना, माणकेश्वर येथील प्राचीन महादेव मंदिर, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Abasaheb Dharmraj Sabale
Last Updated:
यादवराजा सिंघनदेवाच्या दानलेखाचा शिलालेख आहे. शिलालेखावर "स्वस्ति श्री सकु, 1945 सुभानु, संवत्सरे, माघ शुध 10, रवी, स्वास्ति श्री यादवकुल कमलकलीकावासी भास्कर श्री सिंघनदेव श्री माणकेश्वरी दत्त अक्षरं किताडः" असा मजकूर आहे.
उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील माणकेश्वर येथे प्राचीन शिवमंदिर आहे. वास्तुकलेचा नमुना म्हणजे सुंदर कलाकृतींनी युक्त असे माणकेश्वरचे शिवमंदिर विश्वरूपा नदीच्या किनाऱ्यावर आहे. आपल्या कलाकृतीपूर्ण या शिवमंदिरामुळे माणकेश्वर गावाला ओळखले जाते. माणकेश्वर गावापासून 1 किलोमीटर अंतरावर हे ऐतिहासिक शिवमंदिर हेमाडपंथी शैलीचे वैभव अद्याप टिकवून आहे. मंदिरात एक शिलालेखही आढळून येतो.
यादवराजा सिंघनदेवाच्या दानलेखाचा शिलालेख आहे. शिलालेखावर "स्वस्ति श्री सकु, 1945 सुभानु, संवत्सरे, माघ शुध 10, रवी, स्वास्ति श्री यादवकुल कमलकलीकावासी भास्कर श्री सिंघनदेव श्री माणकेश्वरी दत्त अक्षरं किताडः" असा मजकूर आहे.
advertisement
मंदिराची रचनामुख्य मंडप सभामंडप अंतराळ व गर्भगृह असलेले हे मंदिर उप पिठावर उभारलेले आहे. हे उपपीठ नक्षत्राकर असून त्यावर प्रदक्षिणा मार्ग आहे. दोन अर्धस्तंभ आणि दोन पूर्ण स्तंभयुक्तमुख मंडपानंतर चौरसाकृती मोठा सभा मंडप आहे. त्यावर 10 फूट उंच, 2 फूट रुंद असे 20 नक्षीदार खांब आहेत. या खांबांवर शिव,भैरव, कृष्ण व इतर देवतांच्या आकृती कोरण्यात आले आहेत.
advertisement
मंदिरामध्ये 1.55 मीटर खोल खाली प्रचंड आकाराचे स्वयंभू शिवलिंग आहे. गर्भगृहावर छोटे शिखरही आहे. गर्भगृहाच्या चौकटीवर तसेच आतही सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत. मुख्य मंदिराच्या समोर नंदी मंडप आहे. त्यामध्ये नंदीची भली मोठी मूर्ती कोरलेली आहे. मंदिराच्या बाह्य भागावर पद्मदेवता सुरसुंदरी अप्सरांच्या सुंदर अशा मूर्तींबरोबरच गजथर देखील कोरलेला आहे.
advertisement
गायींच्या गोवऱ्यांतून भाऊ बहीण करतायेत लाखोंची उलाढाल, सोलापुरातील प्रेरणादायी कहाणी!
माणकेश्वर येथील हे शिवमंदिर स्थापत्यशैलीचा अद्भुत नमुना आहे. मंदिराच्या अंतर्बाह्य भागावर अत्यंत उत्कृष्ट कोरीव नक्षीकाम करण्यात आले. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी वर्षभर भाविकांची मोठी गर्दी असते.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
August 12, 2024 1:55 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
स्थापत्यशैलीचा अद्भुत नमुना, माणकेश्वर येथील प्राचीन महादेव मंदिर, VIDEO