सातारा : सातारा जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खंबाटकी घाटात ट्रॅफिक जॅम झाल्यामुळे पुण्याकडून सातारकडे जाणारी वाहतूक विस्कळित झाली आहे. घाटातील दत्त मंदिर कॉर्नरजवळ एक गाडी बंद पडल्याने घाटात 1, 2 किलोमीटर पर्यंत गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
...अन् वाहतूक खोळंबली -
पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात सकाळपासून घाटातील दत्त मंदिराजवळ एक गाडी बंद पडल्याने सातारा बाजूकडे जाणारी वाहतूक खोळंबली. घाटातील दत्त कॉर्नरपासून अंदाजे 1, 2 किलोमीटर गाड्यांची लांबच लांब रांग लागली आहे. पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटता सकाळपासून बारीक पावसाच्या सरी सुरू आहेत. शनिवारी-रविवारी घरी जाण्याच्या गडबडीत असलेले अनेक पर्यटक, प्रवासी हे गेले अनेक तास घाटात अडकले आहेत.
advertisement
मोठा चढ असल्याने गाड्या गरम होऊन बंद पडण्याचेही प्रमाण वाढले आहे. घाटात मोठी गाडी बंद पडल्याने अनेक प्रवासांचा मोठा खोळंबा झाल्याचे पाहायला मिळत आहे. खंबाटकी घाटात ट्राफिक जाममुळे पुण्याकडून सातारकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. ही विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामार्ग आणि वाहतूक पोलीस तत्काळ प्रयत्न करत्न असल्याचे दिसत आहे.






