TRENDING:

shani Amavasya: शनि अमावस्येला शनि शिंगणापूरमध्ये चौथाऱ्यावर जाण्यास बंदी, मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय

Last Updated:

श्रावण महिना समाप्ती , शनि अमावस्या आणि लागून आलेल्या सुट्ट्या यामुळे शनि मंदिरात लाखो भाविक दाखल होण्याती शक्यता आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहिल्यानगर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शनी शिंगणापूर येथील शनि मंदिरात शनि अमावास्येनिमित्त होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेत प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शनि अमावस्येच्या दिवशी शनि चौथऱ्यावर जाऊन तेल अभिषेक करण्यास मनाई करण्यात आली आहे. 22 आणि 23 ऑगस्ट रोजी चौथऱ्यावर जाण्यास भाविकांना प्रवेशबंदी असणार आहे.
News18
News18
advertisement

श्रावण महिना समाप्ती , शनि अमावस्या आणि लागून आलेल्या सुट्ट्या यामुळे शनि मंदिरात लाखो भाविक दाखल होण्याती शक्यता आहे. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षततेसाठी मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. शनि अमावस्येच्या दिवशी चौथऱ्यावर जाऊन तेल अभिषेक करण्यास मनाई असणार आहे.  शनिवारी शनि अमावस्या असल्याने यात्रा देखील भरवण्यात येणार असून त्याची तयारी पूर्ण झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

advertisement

दोन दिवस तेलाभिषक करण्यास मनाई

शनि अमावस्येला तेलाभिषेक आणि चौथऱ्यासमोरून दर्शन घेण्याासाठी लाखो भाविक शनिशिंगणापुरात येतात. मात्र यंदा संभाव्य गर्दी लक्षात घेता भाविकांचे दर्शन सुरळीत पार पडावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या महाआरतीपूर्वीपासून ते शनिवारी संध्याकाळपर्यंत चौथऱ्यावरचा तेलाभिषेक बंद ठेवण्याचा

निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांनी चौथऱ्यासमोरून दर्शन घ्यावे, असे विश्वस्त मंडळाने आवाहन केले आहे.

advertisement

मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले

शनि अमावस्येला तेलाभिषेक जरी बंद असला तरीभाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले राहणार आहे.भाविकांच्या सोयीसाठी मंदिराचे दरवाजे मात्र खुले ठेवण्यात आले आहेत. शुक्रवारी सकाळपासून ते रविवारी सकाळपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
shani Amavasya: शनि अमावस्येला शनि शिंगणापूरमध्ये चौथाऱ्यावर जाण्यास बंदी, मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल