ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी नगरसेवकांकडून पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा सिलसिला कायम आहे. काही दिवसांपूर्वी पक्षाचे माजी नगरसेवक व आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय अशी ओळख असलेल्या अमित सरैया यांनीही समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला होता. त्यानंतर आता ठाणे जिल्हा अध्यक्षांनी हा निर्णय घेतल्याने जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का बसला आहे.
advertisement
विकासाच्या मुद्द्याला अनुसरून मी पक्ष बदलला: सुहास देसाई
ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात
सुहास देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या सुहास देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले. विकासाच्या मुद्द्याला अनुसरून मी पक्ष बदलला असे सुहास देसाई या वेळी म्हणाले.
ठाण्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता
सुहास देसाई यांनी आपल्या पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे कुठेही कसलाही भेदभाव होणार नाही याची काळजी आनंद परांजपे आणि नजिब मुल्ला यांनी घेतली पाहिजे अशा सूचना अजित पवार यांनी यावेळी दिल्या. देसाई यांच्या प्रवेशामुळे ठाण्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. ही राजकीय घडामोड राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षाला आणखी धार देणारी आहे.