नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राधाकृष्ण यांचा मुलगा आणि माजी खासदार सुजय विखे पाटील पराभूत झाले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तुलनेने नवखे नेते निलेश लंके यांनी विखे पाटलांचा पराभव केला. आता या पराभवाचा वचपा काढायला महायुतीने कंबर कसली आहे.
शिर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या राजेंद्र पिपाडा यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. भाजपकडून राजेंद्र पिपाडा यांची बंडखोरी शमवण्यासाठी अखेरपर्यंत भाजपकडून प्रयत्न केले जात होते. राजेंद्र पिपाडा आणि त्यांच्या पत्नीला मुंबईत चर्चेला आणण्यासाठी भाजपकडून शिर्डीत स्पेशल चार्टड फ्लाईट पाठवण्यात आले होते. मात्र भाजपचे प्रयत्न निष्फळ ठरले.
advertisement
शिर्डी विधानसभा मतदारसंघ इतिहास
शिर्डी विधानसभा मतदारसंघ राहाता व संगमनेर तालुक्यातील गावांचा समावेश होतो. शिर्डी आणि राहता-पिंपळा या दोन नगरपालिकांचा या मतदारसंघात समावेश होतो. 1995 पासून शिर्डी विधानसभा मतदारसंघावर राधाकृष्ण विखे पाटील सलग निवडून येत आहेत. पूर्वी ते काँग्रेसमध्ये होते. आता भाजपावासी झालेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांचं वर्चस्व मतदारसंघावर राहिलं आहे. विखे पाटील यांनी काँग्रेस मग काही काळ शिवसेना पुन्हा काँग्रेस आणि आता भाजपा, असा विविध पक्षांचा राजकीय प्रवास केला आहे. पक्ष बदलले तरी शिर्डी विधानसभेतून राधाकृष्ण विखे पाटील आमदार म्हणून सातत्याने निवडून येत राहिले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीआधीच त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपामध्ये प्रवेश केला आणि मंत्रीपदही मिळवलं. एकाच टर्ममध्ये विरोधी पक्षनेते आणि त्यानंतर कॅबिनेट मंत्रिपद मिळवलेले एकनाथ शिंदे यांच्यानंतर ते दुसरे नेते ठरले.
2019 विधानसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघात काय झालं?
राधाकृष्ण विखे पाटील – भाजप – 132316
सुरेश थोरात –काँग्रेस - 45292
गेल्या विधानसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे त्यांच्याविरोधात कुणीही तगडा उमेदवार नव्हता. या निवडणुकीत विखे पाटील यांनी तब्बल 87 हजार मताधिक्यांनी काँग्रेसच्या सुऱेश थोरातांविरोधात विजय मिळवला. महाविकास आघाडीने प्रभावती घोगरे यांना उमेदवारी दिली गेली आहे. लोणी खुर्द गावच्या लोकनियुक्ती सरपंच असलेल्या घोगरे यांना थेट विधानसभेचं तिकीट दिलं गेलं आहे. विखे पाटील यांच्या त्या कट्टर विरोधक आहेत. बाळासाहेब थोरात यांनी विख्यांच्या सगळ्या विरोधकांना एकत्र आणून घोगरे यांना बळ देण्याचा डाव रचला आहे. या आव्हानांना विखे पाटील कसं तोंड देतात आणि बालेकिल्ला राखतात का हे लवकरच कळेल.
लोकसभा 2024 ला काय झालं?
शिर्डी विधानसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघात येतो. शिर्डीत 2024 लोकसभा निवडणुकीला सेना विरुद्ध सेना असा थेट सामना झाला होता. भाऊसाहेब वाकचौरे यांना शिवसेना उबाठा पक्षातर्फे तिकिट मिळालं होतं. तर माजी खासदार सदाशिव लोखंडे शिंदेंच्या गोटात होतं. महायुतीने शिवसेनेतर्फे त्यांनाच पुन्हा तिकिट दिलं होतं. सदाशिव लोखंडे 2014 आणि 2019 दोन्ही निवडणुका शिवसेनेतर्फे जिंकल्या होत्या. पण एकनाथ शिंदे महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडल्यावर लोखंडे यांनी शिंदेंना साथ दिली होती. या लोखंडेंचा 4000 मतांनी शिर्डीतून पराभव झाला. शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या मतदार संघातही लोखंडे पिछाडीवर होते. शिवाय आमदार विख्याचे चिरंजीव सुजय विखे पाटील शेजारच्या दक्षिण अहमदनगरमधून लोकसभेला उभे राहिले होते. पण त्यांनाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीने नामोहरम केलं.
अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचं सध्याचं बलाबल
राज्यातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 12 मतदारसंघ आहेत.
1. अकोले - किरण लहामटे (राष्ट्रवादी)
2. संगमनेर - बाळासाहेब थोरात (काँग्रेस)
3. शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील (भाजप)
4. कोपरगाव - आशुतोष काळे (राष्ट्रवादी)
5. श्रीरामपूर - लहू कानडे (काँग्रेस) आता राष्ट्रवादी
6. नेवासा- शंकरराव गडाख (अपक्ष) आता शिवसेना (उबाठा)
7. शेवगाव पाथर्डी - मोनिका राजळे (भाजप)
8. राहुरी - प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी)
9. पारनेर - निलेश लंके (राष्ट्रवादी) सध्या रिक्त
10. अहमदनगर शहर - संग्राम जगताप (राष्ट्रवादी)
11. श्रीगोंदा- बबनराव पाचपुते (भाजप)
