अकोल्यातील डॉ. विलास तायडे लिखीत वाड्:मय विलास गौरवग्रंथ' आणि 'बैलबंडी ते हवाई दिंडी' या दोन्ही पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्याला श्रीपाल सबनीस प्रमुख पाहुणे होते. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी चातुर्वण्य व्यवस्था, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला लढा, महात्मा गांधी यांची हत्या, हत्येत नथुरामचा असलेला सहभाग आदी विषयांवर मते व्यक्त केली.
नथुराम गोडसे हा नीच नालायक, काहींना धर्माची मग्रुरी
advertisement
सबनीस म्हणाले, नथुराम गोडसे हा नीच नालायक ब्राह्मण होता. त्यानेच महात्मा गांधी यांची हत्या केली. सध्याच्या परिस्थितीत जे त्याचे पुतळे उभारतायेत, त्यांना धर्माची मग्रुरी आहे. अशा धर्मापासून देशाचे संरक्षण करण्याची गरज आहे.
जनतेची मते २ हजारात विकत घेतात आणि आमदार ५ कोटींना विकले जातात, अशा देशाचे भवितव्य काय?
यावेळी त्यांनी लोकशाही व्यवस्थेत होणाऱ्या निवडणुकांच्या वेळी राजकीय पक्षांच्या वर्तनावरही आक्षेप नोंदवले. आपल्या देशात दोन हजार देऊन मते विकली घेतली जातात. तसेच निवडून आलेला आमदार पाच कोटी रुपयांना विकला जातो. अशा देशाचे भवितव्य काय असणार? असा सवाल उपस्थित करीत देशातील जनतेने लोकशाही विकायला काढली आहे, अशी खंत श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केली.