सोलापूर : परिस्थिती अभावी अनेकांना शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे काही जण खचतात. पण काही जण न खचता कठोर मेहनत घेतात आणि स्वत:चा व्यवसाय उभा करतात आणि सर्वांसमोर प्रेरणादायी उदाहरण उभे करतात. आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत.
सहा हजार महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सोलापुरातील महालक्ष्मी गृह-उद्योग समोर आला आहे. शहरातील मरिआई चौकात आहे.राजेश उर्फ राजू डोंगरे यांचा पापड बनवण्याचा उद्योग. राजेश डोंगरे यांचा शिक्षण सातवीपर्यंत झाला आहे. उडीद डाळीचे पापड, तांदळाचे पापड, आदी पापड या ठिकाणी बनवले जातात.सोलापूर शहरातील ६ हजार महिलांना रोजगार देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे राजू डोंगरे यांनी ' लोकल18'शी बोलताना सांगितले.
advertisement
पावसाचा जोर वाढला! राज्याच्या 'या' भागात होणार अति मुसळधार पाऊस, तुमच्या भागात अशी असणार परिस्थिती
राजेश डोंगरे हे सोलापुरातील एका गिरणी कामगाराचा मुलगा आहे. गिरणी बंद झाल्यामुळे कुटुंबाची हलाखीची परिस्थिती असल्यामुळे शिक्षण घेऊ शकले नाही. लहानपणापासूनच त्यांनी अंगमेहनत करून घराच्या उत्पन्नासाठी हातभार लावला आहे. शिक्षण कमी शिकल्यामुळे या तरुणानं 2013 साली सोलापुरात महालक्ष्मी पापड या नावाने उद्योग उद्योग सुरू केला.
उद्योग सुरू केल्यानंतर त्यांच्याजवळ सुरुवातीला ४ महिला कामगार होते.आता जवळपास सहा हजार महिलांना कामगार असुन राजेश डोंगरे यांना पापड बनवून देतात.राजेश डोंगरे यांचे वडील विष्णू मिल मध्ये कामाला होते, त्या नंतर राजेश डोंगरे यांच्या आईने त्याच मिल मध्ये वॉचमन म्हणून काम केले, त्याच बरोबर पापड लाटण्याचे कामही ते करु लागले.या कामामध्ये त्यांची मुले ही मदत करत होती.
राजू डोंगरे यांनी सातवी पर्यंत शिक्षण घेतलेले असताना देखील स्वतःच्या कष्टाच्या जोरावर महालक्ष्मी पापड उद्योग हा भरभराटीस आणला आहे. सोलापूर शहरातील आता त्यांचे याच नावाने अकरा सेंटर असून यामध्ये महिलांना पापड बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच महालक्ष्मी पापड हे सोलापूर शहरासह इतर राज्यातही विक्री केला जात आहे. तर मुंबई येथील एका नामांकित हॉटेलला देखील महालक्ष्मी पापड पुरवले जातात.
गरीब परिस्थितीतून आज एक प्रसिद्ध पापड व्यायासायिक इथं पर्यंत चा प्रवास करताना त्यांना ही खुप अडचणी आल्या पण सर्व अडचणी वर मात करत, आज एक उत्तम आणि यशस्वी व्यायासायिक बनवून दाखवले आहे.