आषाढी विशेष गाड्या कुठे धावणार?
आषाढी वारीनिमित्त नागपूर ते मिरज 4 विशेष सेवा, नवीन अमरावती ते पंढरपूर 4 सेवा, खामगाव ते पंढरपूर 4 सेवा, भुसावळ ते पंढरपूर अनारक्षित विशेष गाडीच्या 2 सेवा, लातूर ते पंढरपूर अनारक्षित विशेष गाडीच्या 10 सेवा असतील. तसेच मिरज ते कलबुर्गी अनारक्षित विशेष गाड्यांच्या 20 सेवा, कोल्हापूर ते कुर्डुवाडी अनारक्षित विशेष गाड्यांच्या 20 सेवा आणि पुणे ते मिरज अनारक्षित विशेष गाड्यांच्या 16 सेवा चालवण्यात येतील.
advertisement
Vande Bharat: कोल्हापूरकरांसाठी खूशखबर! मुंबईचा प्रवास आरामदायी होणार, लवकरच धावणार वंदे भारत
आषाढी विशेष ट्रेनचे आरक्षण विशेष शुल्कासह 16 जूनपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होईल, असे मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यामुळे आषाढी वारीच्या वेळी प्रवासाची गैरसोय टाळण्यासाठी विठ्ठल भक्तांना लवकरच आपले तिकीट बूक करावे लागेल.
दरम्यान, आषाढी वारीसाठी राज्यातूनच नव्हे तर देशभरातून लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येत असतात. भाविकांच्या सोयीसाठी एसटीने देखील जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच रेल्वे देखील आषाढी विशेष गाड्या चालवणार आहे.