सोलापूर : विज्ञानाने प्रगती केल्याने आधुनिकीकरणाचे वारे शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्याने यंत्रांचा वापर वाढला आहे. बहुतांश कामे यंत्राच्या सहाय्याने शेतकरी करत आहेत. परिणामी पिढ्यानपिढ्या व्यवसाय करून कुटुंबाची उपजीविका भागविणाऱ्या सुतार समाजावर उतरती कळा आल्याचे ग्रामीण भागात दिसून येत आहे.
अंगी कारागीराचे गुण असतानाही उदरनिर्वाहासाठी सुतारबांधवांना पर्याय म्हणून रोजंदारी करावी लागत आहे. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील हराळवाडी येथील रहिवासी आतासुद्धा सुतार काम करत आहे. हरिदास देविदास सुतार (वय 55 वर्ष, रा. हराळवाडी) असे या सुताराचे नाव आहे. हरिदास देविदास सुतार वयाच्या 20 वर्षापासुन सुतार काम करत आहे.
advertisement
मृग नक्षत्र सुरुवात होताच ग्रामीण भागातील शेतकरी सुताराकडे गर्दी करायचा. कुणाला तिफन, वखर, किंवा काकरी शेतकरी बनवत होता. सुतारकाम करणारे कारागीर मोजकेच असल्याने शेतकऱ्यांना त्या कारागिराची मनधरणी करावी लागत होती. मात्र, लाकडी साहित्याची जागा लोखंडी अवजाराने घेतल्याने याचा परिणाम सुतारकामावर झाल्याचे दिसते आहे.
15 महिन्यात एकरी कमावले 11 लाख रुपये, साताऱ्याच्या शेतकऱ्यानं कशाची शेती केली?, VIDEO
काही वर्षापूर्वी प्रत्येक शेतकरी शेतात तिफनचा वापर पेरणीसाठी करीत होता. आता मात्र तिफनची जागा ट्रॅक्टरने घेतल्याने पेरणीसुद्धा ट्रॅक्टरच्या सहाय्याने होऊ लागल्याने काळ्या मातीत चालणारी तिफनसुद्धा काळाच्या पडद्याआड गेली आहे. येणाऱ्या पिढीला शेतीतील लाकडी अवजारांचा शेतकरी उपयोग करत होता, हे मात्र चित्र पुस्तकातूनच पाहायला मिळतील काय, असे दिसत आहे.
पूर्वीच्या काळात ग्रामीण भागात सुतार कारागिराचा विशिष्ट जेथे राहायचे, त्या ठिकाणाला ग्रामीण भागात ‘कामठा‘ हा शब्द प्रचलित होता. आता तो कामठा काळाच्या पडद्याआड गेल्याने ग्रामीण भागातील शेतकरीही त्याकडे फिरकत नसल्याचे चित्र आहे. सुतार कारागीर काम करणारे नवीन कारागीही तयार होत नाही. कारण विज्ञानाने प्रगती केल्याने ही समस्या ही मोठी निर्माण झाली असल्याने कारागीरसुद्धा दिसेनासे झाले आहे.