Ganeshotsav Nashik : ढोल पथकांना करावे लागणार नियमांचे पालन, नाशिक पोलीस उपायुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत ढोल पथकांचा मोठा साहभाग असतो. यात एक पथकाच्या चार रांगा केलेल्या असतात. यामुळे गणेश मंडळ लवकर पुढे सरकत नसल्याच्या तक्रारीत वाढ होते आहे.
कुणाल दंडगव्हाळ, प्रतिनिधी
नाशिक : सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे थाटामाटात, ढोलताशाच्या गजरात सर्वत्र आगमन झाले आहे. तसेच यावेळी ढोलपथकांची वाढती संख्या पाहून आगामी बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत ढोल पथकांवर काही नियम लावण्यात आले आहे. तसेच या नियमांचे पालन न केल्यास कारवाई केली जाणार आहे. नाशिकचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली.
गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत ढोल पथकांचा मोठा साहभाग असतो. यात एक पथकाच्या चार रांगा केलेल्या असतात. यामुळे गणेश मंडळ लवकर पुढे सरकत नसल्याच्या तक्रारीत वाढ होते आहे. तसेच ढोल पथकात महिलांसह 5 ते 30 वर्षाच्या तरुण-तरुणीही मोठ्या प्रमाणात दिसतात. यावेळी काही गैरकृत्य होऊ नये, यासाठी नाशिक पोलीस दलान ढोलपथकासाठी काही नियम केले आहेत. तसेच या नियमांचे पालन करणे सर्वाना बंधनकारक ठरणार आहे.
advertisement
आगामी गणेश विसर्जनाच्या दिवशी भद्रकालीतील वाकडी बारव येथून मुख्य मिरवणुकीला सुरुवात होते. त्यात विविध देखावे आणि आरास असतात. त्याचबरोबर ढोलपथक आणि लेझीम पथकसुद्धा यावेळी आपल्या कलेचे प्रदर्शन करीत असतात. परंतु हे करत असताना कुठल्याही प्रकारे वाहतूक कोंडी आणि सामान्य नागरिकांना अडचण होणार नाही, याची काळजी घ्यावी.
advertisement
ST च्या ताफ्यात येणार 5 हजार नवीन बस, पैकी 1310 असणार भाडेतत्त्वावर, कशी असेल नेमकी प्रक्रिया
अनके मंडळ दोरखंड वापरतात. त्याचा वापर टाळावा आणि केल्यास येणाऱ्या आणि जाणाऱ्या अशा दोघी बाजूस जागा सोडावी. तसेच कुठल्याही मंडळांनी बेशिस्तपणे कृत्य केले अथवा पथकाने कुठलेही नियम तोडल्यास पथकाच्या प्रमुखावर योग्य कारवाई करण्यात येणार आहे. मिरवणुकीत एका पॉईंटवर केवळ 50 वादक वाद्य वाजवतील आणि 20 मिनिटंपेक्षा जास्त वेळ परवानगी राहणार नाही.
advertisement
तसेच पथकाचे वाद्य वाजवताना फक्त 4 रंग असणार आहेत. मार्गावरील स्वागत मंडपावर वाद्यपथके थांबणार नाही, अशा सूचना नाशिक पोलीस उपायुक्तांनी नाशिकमधील सर्व ढोल पथकांना केल्या आहेत.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
September 09, 2024 12:36 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Ganeshotsav Nashik : ढोल पथकांना करावे लागणार नियमांचे पालन, नाशिक पोलीस उपायुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती