जालना - तिरुचानूर विशेष रेल्वे गाडी
जालना - तिरुचानूर साप्ताहिक विशेष गाडी क्रमांक 07653 ही 19 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत दर रविवारी जालना येथून संध्याकाळी 07:20 मिनिटाला निघेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 09:30 मिनिटाला तिरुचानूर येथे पोहोचेल. तर या गाडीच्या एकूण 7 फेऱ्या होणार आहेत.
advertisement
गाडी क्रमांक 07654 तिरुचानूर - जालना विशेष गाडी 20 ऑक्टोबर ते 01 डिसेंबरपर्यंत दर सोमवारी रात्री 11:30 मिनिटाला तिरुचानूर येथून निघेल आणि तिसऱ्या दिवशी मध्यरात्री 12:15 मिनिटाला जालना येथे पोहोचेल. या गाडीच्या एकूण 7 फेऱ्या होणार आहेत.
जालना - तिरुचानूर विशेष रेल्वे गाडी थांबे
परतूर, सेलू, परभणी जंक्शन, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, धाराशिव, बार्शी टाऊन, कुर्डुवाडी, सोलापूर, दुधनी, गणागापूर रोड, कलबुर्गी, शहाबाद, वाडी, यादगीर, कृष्णा, रायचूर, मंत्रालयम रोड, अदोनी, गुंतकल, गुत्ती, अनंतपूर, धर्मावरम जंक्शन, कदिरी, मदनपल्ली रोड, पिलेर, पाकला जंक्शन आणि तिरुपती या रेल्वे स्थानकांवर थांबा मिळणार आहे. प्रवाशांनी वैध तिकिटांसह प्रवास करून विशेष सेवेचा लाभ घ्यावा, अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.